सौ. लीना मेहेंदळे यांनी केलेल्या व्याख्यानाचा सारांश

सौ. लीना मेहेंदळे. यांनि चित्पावन ब्राह्मण संघामधे केलेल्या व्याख्यानाचा सारांश .
कोकण निर्मात्या परशुरामाला वंदन करुन लीनाताईंनी व्याख्यानाला सुरुवात केली. १९७४ ते २०१० ह्या प्रदिर्घ सेवेतिल अनुभव त्यांनि एक-एक करुन उलगडून सांगितले.
त्या म्हणाल्या की ,“ब्रिटिश काळात प्रशासन हे जनतेपेक्षा राणीला जबाबदार होते आजही ते लोकाभिमुख नाहि. प्रशासनात आजही मनमानी बदल्या केल्या जातात. श्री .अरुण भाटिया यांच्यासारखा अधिकारी जेव्हा अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवतो त्यावेळेला कसा जनतेचा विरोध असताना पण त्यांची बदली होते ह्याचे उदाहरण दिले.
भारतात होऊ घातलेल्या मोठ-मोठ्या उर्जा प्रकल्पांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की “आज उर्जा निर्मितीपेक्षाहि उर्जा बचत आवश्यक आहे.” उर्जा बचतिच्या ‘Nega-watt’ य़ा संकल्पनेचि त्यांनी माहिती दिली.उर्जाबचतिबाबत अपण जपानचा आदर्श घ्यायला हवा असं
मतं त्यांनी व्यक्त केलं.
ए. राजांवर FIR दाखल करण्यात होत असणाय्रा दिरंगाइबद्दल त्यांनी सरकारच्या दुटप्पि धोरणावर ताशेरे ओढले. सेवेत असताना बदल्यांना घाबरुन तत्वांशि तडजोड केली नाही असं त्या म्हणाल्या..
----------------------------------------------------------------
सौ. लीना मेहेंदळे. यांनि चित्पावन ब्राह्मण संघामधे संस्कृत विद्वानांशि साधलेला संवाद..
दि.२३/१२/२०१०
चर्चेची सुरूवात विद्वतजनांच्या परिचयाने झाली.सर्वप्रथम त्यांनी
कौशलम् ट्रस्ट चा नियोजित उपक्रम ‘संस्कृत की दुनिया’या T.V Serial ची माहिती दिली. इतिहास, विज्ञान,भुगोल या क्षेत्रात प्राचिन संस्कृत ग्रंथांचे असलेले महत्व त्यानी विषद केले. भारतिय भाषांमधे असलेले अगाध ज्ञान संगणाकावर येण्याची गरज त्यांनि व्यक्त केली.त्यासाठी संस्कृत प्रेमिंनी संगणक शिकावा असे आवाहन केले.
संस्कृत शिक्षणाचा उपयोग हा संपुर्ण भारताचि संस्कृति समजण्यासाठी होतो. आज CORPORATE जगतात सुद्धा संस्कृतच्या जाणकार लोकांचा सन्मान होतो. असे त्या म्हणाल्या.
संस्कृत भाषा ही UPSC Exams मधे मार्क मिळवुन देणारी
भाषा असल्याने स्पर्धा परिक्षांना उपयुक्त ठरते असं एका प्रश्णाचे उत्तर देताना त्यांनी नमुद केले.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९