Posts

Showing posts with the label devnagari-script

इनस्क्रिप्ट मराठी धपाधप लेखन हेतू this article n site

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट [[ खालील लेखाइतकेच हे 2 व्हिडियो पण सवडीने पाहिल्यास उपयोगी आहेत. Inscript-part- 1-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू Inscript-part- 2-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू तसेच ही लिंक देखील पहावी. Link - लीना मेहेंदळे, भा.प्र.से. ]] सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट. शासकीय कार्यालयांत तर हा अनुभव पदोपदी येतो. बारा पंधरा वर्षांपूर्वी कधीतरी शासनाने क्लार्क व टायपिस्ट असे दोन पदांमधले अंतर काढून टाकले. सर्वांचे नामकरण क्लार्क कम टायपिस्ट असे केले. ज्यांना टायपिंग येत नसेल ते शिकून घ्यावे असा फतवा काढला. झालेच तर जे शि...