Posts

Showing posts from January, 2018

सामाजिक सुरक्षा लेख २ महिलांची सामाजिक सुरक्षा

सामाजिक सुरक्षा लेख २  http://epaper.evivek.com/epaper.aspx?lang=2025&spage=Mpage&NB=2017-12-31#Mpage_14 सामाजिक सुरक्षा व महिला  विवेक मराठी    26-Dec-2017 ***लीना मेहेंदळे*** आज भारतीय महिलांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे, ती धोक्यात आणणारे प्रमुख मुद्दे गुन्हेगारीत मोडतात. बलात्कार आणि स्त्रीभू्रण हत्या हे ते दोन विषय. हुंडाबळी, महिला कैदी, अनाथ बालिका, मतिमंद बालिका, देहव्यापारात फेकल्या गेलेल्या महिला, या आणि अशा अनेक महिलांना सामाजिक सुरक्षेची गरज आहे. महिलांच्या बाबतीत सामाजिक सुरक्षा, महिला सबलीकरण आणि गुन्ह्याचा बळी न होणे या तिन्ही बाबी एकमेकांशी एवढया निगडित आहेत की त्यांच्या सीमारेषा पुसलेल्याच आहेत. कोणती बाब सामाजिक सुरक्षेची आणि कोणती सबलीकरणाची हे ठरवणे कठीण आहे. एकूणच स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षेचे प्रश्न खूप आहेत व खूप गंभीर आहेत. त्यासाठी समाजप्रबोधन, संस्कार, विशेषतः एकत्र कुटुंबाचा व स्त्री सन्मानाचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. मागील लेखात सामाजिक सुरक्षेचा विचार करताना आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची थोडी दखल घेतली होती. आता महिलांच्या बाब

सामाजिक सुरक्षा लेख ३ बालकांचे प्रश्न सा.विवेक मराठी 07-Jan-2018

बालकांचे प्रश्न-एक दृष्टिक्षेप विवेक मराठी    07-Jan-2018 Also see in print at  http://epaper.evivek.com/epaper.aspx?lang=2025&spage=Mpage&NB=2018-01-07#Mpage_13 ** लीना मेहेंदळे*** सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून सरकारी तसेच खाजगी शाळांमधील मागास जातीतील, मागास जनजातीतील तसेच इतर मागासवर्गीय मुलींमुलांची फी माफ असून हा खर्च शासनातर्फे शाळांना अदा केला जातो. आता आर्थिकदृष्टया मागास ठरवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनादेखील हा फायदा मिळू शकेल. यामुळे अशा मुलांना शाळा जरी सुलभ झाली असली, तरी एकुणात शिक्षणाचा दर्जा घसरणे, नोकरीच्या बाजारात निव्वळ दहा वर्षांचे शिक्षण पुरेसे नसणे व मिळणारे शिक्षण हे जीवन जगण्याला शिकवू शकत नसणे यामुळे या सामाजिक सुरक्षा उपायाचे फलित पूर्णपणे मिळू शकत नाही.  भारतातील जनसंख्येपैकी एक पंचमाश म्हणजे वीस टक्के जनता 1 ते 10 या वयोगटात आहे. म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही वयोगटाच्या तुलनेत या गटाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल 11 ते 20 या वयोगटांत सोळा ते सतरा टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. देशाची भावी पिढी ती हीच. पण या पिढीची सामाजिक सुरक्षा