Posts

Showing posts from August, 2022

लोकशाही, भ्रष्टाचार आणि ईडी २२-०८-२०२२ Published on 09-09-2022

Published on 09-09-2022  २२-०८-२०२२ (पुढारीकडे पाठवला) लोकशाही , भ्रष्टाचार आणि ईडी लीना मेहेंदळे मो . नं ९४२२०५५७४० गेल्या महिन्याभरात ईडीने टाकलेल्या धाडी व त्यातून जप्त केलेली संपत्ति या बातम्यांनी देश ढवळून निघाला आहे . महाराष्ट्रात संजय राऊतची अटक असो अगर बंगाल मधे अर्पिता व पार्थ चटर्जीची असो , दिल्लीत सत्येंद्र जैनची अटक असो अगर रांची येथे पूर्व IAS पूजा सिंघलची अटक असो , किंवा अगदी राहुल व सोनिया गांधी यांना काढलेले समन असो , त्या त्या आरोपी कडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून दावा केला जातो की देशात लोकशाहीची हत्या होत आहे . या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला वॉशिंग मशीन म्हटले जाते . विरोधकांना म्हणायचे असते की जर कोणी ED चे समन येण्याआधीच भाजप मधे शामिल झाला तर त्याच्या वर ED ची पुढील कार्यवाही होत नाही . ईडीच्या तावडीत येणाऱ्या व्यक्तींचा दावा असतो की भारतीय लोकशाहीला खरा धोका त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे नसून भाजपाच्या वॉशिंग मशीन असण्यामुळे आहे . म्हणून या मुद्याचा परामर्श घेणे आवश्यक आहे . सर्वात आधी हे ओळखायला हवे की भ्रष्ठाचाराचा धोका आपल्याला कोणत्या टोकाच

श्रीगीतामंजूषामंथन ११ भाग १ स्वागत व परिचय

Image