Posts

Showing posts from May, 2008

सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट

सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट - लीना मेहेंदळे वाचकहो, सर्वत्र असते तसेच याही लेखातील सर्व घटना, स्थानांची व व्यक्तींची नांवे संपूर्णपणे काल्पनिक असून त्यात कोणताही तथ्यांश नाही. जर कोणत्याही व्यक्ती किंवा स्थानाचे नांव किंवा घटनेचा तपशील एखाद्या सत्य घटनेबरोबर मिळता-जुळता असेल तर तो निव्वळ योगायोग मानावा. तर रसिक वाचकहो, आटपाट नगर होते- तिचे नांव मुंबई. तिथे एक मोठी वास्तू होती - जिचे नांव माहीत नाही. परंतु तिथे नित्यनेमाने नाट्यस्पर्धा होत असत. त्या यशस्वी होण्यासाठी एक मुख्य सूत्रधार व त्यांचेबरोबर इतर छप्पन सूत्रधार होते. नाट्यस्पर्धा पहाण्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. वास्तूच्या दारावर हीss गर्दी असायची. परत जाणारी मंडळी फारशी खूष असावीत असे मला वाटत नाही. कारण बहुतेक प्रेक्षक नाक मुरडीत, नावे ठेवीत जात- इथे येणार्‍याच्या पदरांत कांहीच पडत नाही. हे कसले नाटक - या कसल्या स्पर्धा ? कोण, कोणाशी काय संवाद बोलतो तेच कळत नाही. पडदे कधीही कुठल्याही प्रसंगी पडतात. शिवाय प्रत्येक पात्राच्या शिरावर एक ओझ असते. त्यामुळे त्यांचे चेहरे सदा ओढग्रस्त दिसतात. एक पात्र विंगेत जाऊन परत आल

इनस्क्रिप्ट मराठी धपाधप लेखन हेतू this article n site

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट [[ खालील लेखाइतकेच हे 2 व्हिडियो पण सवडीने पाहिल्यास उपयोगी आहेत. Inscript-part- 1-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू Inscript-part- 2-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू तसेच ही लिंक देखील पहावी. Link - लीना मेहेंदळे, भा.प्र.से. ]] सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट. शासकीय कार्यालयांत तर हा अनुभव पदोपदी येतो. बारा पंधरा वर्षांपूर्वी कधीतरी शासनाने क्लार्क व टायपिस्ट असे दोन पदांमधले अंतर काढून टाकले. सर्वांचे नामकरण क्लार्क कम टायपिस्ट असे केले. ज्यांना टायपिंग येत नसेल ते शिकून घ्यावे असा फतवा काढला. झालेच तर जे शि

खिंडीच्या पलीकडे --Khindichya Palikade -A novel

Image
तू सांगितलेला प्रवास शेवटच्या खिंडीपर्यंत घेऊन जातो. किती विचित्र आहे हा प्रवास. एखाद्याने तो पटपट संपवू म्हटला तर संपत नाही, खोडकर ढग नकोत म्हटलं तर ढगांची दरी संपत नाही, आणि खेळकर ढगांसोबत खेळायचय म्हटलं की प्रवास संपून जातो. पण तू मला पुढची गोष्ट सांग ना। हे पंच लोकांना काहीही सांगतात. मी प्रवासाला जाईन ना तेंव्हा लोकांना सांगेन त्यांचं ऐकू नका, माझं ऐका...... म्हणजे तू पण त्यांच्यासारखाच होणार तर?..... नाही, नाही, तसं नाही, पण मग पंचाची चलाखी कशी संपवायची?...... एकच उपाय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. सगळे मला सांगतात कुणी तरी हो.... पण कुणीही नाही झालं तर?.... कुणीही न होणं म्हणजे उन्मुक्त स्वर, पक्ष्यांचं मंजुळ गाणं, सुगंधाचा स्त्रोत.... आणि शेवटच्या खिंडीपलीकडे कांय आहे? कारण प्रवास तर तिथेही थांबत नाही. सांग ना। khindichya palikade -- A novel Here is the book Translated from Ravindra Nath Prasher's English Novel THE LAST PASS Published in Lokmat, Nashik, Diwali 2002?