Posts

Showing posts from May, 2020

श्री भूवलय -- जैन मुनि आचार्य कुमुदेंदू विरचित अद्भुत ग्रंथ

आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..?’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…! याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..! मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे – राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद

रवि पटवर्धन नाट्यकलाकार

रवी पटवर्धन ‘‘माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या वयात मृत्यू अटळ आहे. पण औषधं, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर मृत्यूला लांब उभं राहायला भाग पाडायचं ही माझी जिद्द आहे. त्याच जोरावर आज वयाच्या ८२ व्या वर्षी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक मर्यादांचाच पुरेपूर उपयोग करत ‘आरण्यक’ नाटकाद्वारे मी रंगभूमीवर ठामपणे उभा आहे. ’’ १९४४ चा नाटय़महोत्सव. त्याचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर स्वागताध्यक्ष होते आचार्य अत्रे. त्या नाटय़महोत्सवातल्या बालनाटय़ात अवघ्या साडेसहा वर्षांच्या एका बालकलाकाराच्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला. तो बालकलाकार मी- रवी पटवर्धन! तेव्हा मला स्वत:लाही जाणीव नव्हती की आपण किती मोठय़ा दिग्गज कलाकारांसमोर अभिनय करतोय. पण आज मला वाटतं, साक्षात बालगंधर्वाचा आशीर्वाद मला नकळत मिळून गेला. ते पाथेय घेऊन गेली ७५ वर्षे मी रंगभूमीवर कार्यरत आहे. आजही वयाच्या ८२ व्या वर्षी मी ‘आरण्यक’नाटक करतोय. हे नाटक पहिल्यांदा मी १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबरच केलं होतं. २०१८ मध्ये त्यांनी मला पुन्हा विचारलं, तेव्हा मी तत्काळ

Swatantryaveer Vyakhanmala | Leena Mehendale | Maharashtra state's Liquo...

Image

कोरोना आणि दारू

कोरोना आणि दारू       ३ मे रोजी कोरोना सेकंड लॉकडाऊन संपले आणि देशभरात एक वेगळेच चित्र झळकले .   दारुसाठी रांगा लावल्याचे चित्र. हे विषण्ण करणारे होते . दुसऱ्या , तिसऱ्या दिवशीही रांगा कमी झालेल्या नव्हत्या. ज्या त्या राज्य सरकारांनी केलेल्या कमाईचे आकडे समोर य़ेत होते  - कुणी ४० कोटी तर कोणी ७० कोटींपर्यंत . पार्टीनिरपेक्ष असे हे चित्र होते . बीजेपीशासित राज्यांमध्येही होते आणि कांग्रेस , तृणमूल शासित राज्यांमधेही हेच होते.     दारुखेरीज इ तर दुकाने उघडण्याची परवानगी फक्त १० ते १ अशी होती . दारूसाठी मात्र १० ते ७ अशी होती आणि लोकांनी तर पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या . देशासमोरील आदर्श कोण याचे उत्तरच जणू बदलून गेले होते .  मी खूप बाटल्या विकत घेईन , दारू पीईन , झोपेन , उठलो की पुन्हा दारू पीईन , पुन्हा झोपेन ..... हेच करत राहीन असे टीव्ही चॅनेलवर सांगणारा युवकच बहुधा या देशाचा आदर्श ठरला आहे असे चित्र दिसू लागले. असा तो एकटाच नसून कोट्यावधी युवक याच मानसिकतेत    दिसत आहेत व अजूनही काही काळ दिसणार आहेत .   देशात सर्वात अधिक जीवनावश्यक बाब कोणती याचे उत्तर हवा , पा