Posts

Showing posts from 2016

परीक्षा झाली तणावाची घोडा अडला

परीक्षा झाली तणावाची घोडा अडला ... लीना मेहेंदळे अकबर बिरबलाच्या गोष्टींमध्ये ही एक छानशी गोष्ट आहे . अकबराने आपल्या दरबा - यांना चार प्रश्नांच एक कोड टाकल . उत्तर एकाच ओळीत द्यायचे होते . त्याने विचारले - रोटी क्यूँ जली ? विद्या क्यूं गली ? पानी   क्यूँ   सडा   ? घोडा   क्यूँ   अडा   ? नेहमी प्रमाणे बिरबलाने खूप वेळ वाट पाहिली . इतर दरबाऱ्यां ना संधी दिली . आणि कोणालाच उत्तर येत नाही असे पाहून त्याने कोडयाचे उत्तर तीनच शब्दात सांगितले . - फेरा न था । फेरा - म्हणजे फिरवणे , उलटणे , गतीशील ठेवणे . तव्यावरची पोळी उलटली नाही तर जळते , विद्या शिकत-शिकवत राहिली नाही तर असलेली सुद्धा विस्मृतीत जाते.  पाणी एकाच ठिकाणी साठवून राहिले तर सडते , त्यामध्ये किडे , डास , शेवाळ इ . साठतात . खळखळून वाहणारे पाणी शुध्द होत राहत . घोडा एकाच ठिकाणी बांधून ठेवला , त्याला फिरु दिलं नाही तर त्याचं पाय आखडतात . मग गरजेच्या वेळी तो धावू शकत नाही , तो अडतो . या सर

पश्चिमी समृद्धीची लक्षणे आणि कारणे सा. विवेक १२-०२-२०१७

Image
पश्चिमी समृद्धीची लक्षणे आणि कारणे --लीना मेहेंदळे सा. विवेक १२-०२-२०१७ गेल्या दीड वर्षातील १२ महिने अमेरिका व नीदरलॅण्ड या दोन देशांत गेले .  नोकरीमुळे मुलांबरोबर जास्त काळ घालवता आला नव्हता म्हणून निवृत्तिनंतर त्याची भरपाई हे सांगायला कारणही झाल . या काळांत तिथली समृद्धि व तिची कारणे जवळून पाहिली , आणि पुन्हा पुन्हा जाणवत राहिले की त्यांचे मॉडेल डोळे मिटून उचलणे हे भारताला किती घातक आणि मारक ठरू शकते . दुसरीकडे त्यांच्या काही पद्धति ज्या आपण खरोखरी उचलायला हव्या तिकडे आपण दुर्लक्ष करतो . थोडक्यांत आपला विवेक हा हंसाचा नीरक्षीरविवेक न रहाता पंचतंत्रातील सुतारांच्या रंधाकामाची नक्कल करायला गेलेल्या मर्कटासारखी आपली अवस्था आहे असा थोडासा  त्रागा होण्याची मनस्थिती झाली आहे खरी . असो .  अशी काही उदाहरणे सांगता येतील ज्या योगे समृद्धी टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी तिकडे काय चालले आहे याचा थोडा अंदाज यावा . आपल्याकडे वनजीवनांची मोठी परंपरा होती . वानप्रस्थ आश्रम हा शब्द रूढ होता . वानप्रस्थ म्हणजे वनगमन करणे . सुमारे ५० ते ६० वर्ष वय झाले की आपले अधिपत्य इतरांकडे देऊन आपण का