Posts

Showing posts from June, 2017

बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई

बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई माझी आई - कशी होती ? याबद्दल जगांत कोणीच पूर्णपणे सांगू शकणार नाही कारण तिच्याबद्दल विचार करायला बसल की लक्षांत येत की आपण आपल्या आईला कधीच नीट समजून घेतल नाही . ती आयुष्यांत इतक्या सहजपणे असते आणि वावरते की आपल्याला तिला वेगळी व्यक्ति म्हणून ओळखताच येत नाही . माझी आई सौ. लीला बलराम अग्निहोत्री (बालपणातील लीला दत्तात्रेय नामजोशी) अशीच सहजपणे व प्रसन्नपणे आमच्या आयुष्यात वावरली. आईच थोडक्यांत वर्णन करायच तर सुंदर , बुद्धिमान , आरोग्यसंपन्न ,   गुरू ,  त्यागी ,  कष्टाळू , सत्यवचनी , समंजस ,   कृतज्ञता जोपासणारी , धीर देणारी , संस्कार घडवणारी अशी ती होती .  मला जीवनात भेटलेल्या बुद्धिमान व्यक्तिंमधे माझ्या आईचा क्रम खूप वरचा लागतो. तिच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू मला पहायला मिळाले, जाणीवेत उतरले आणि काही तर संस्कारातही उतरले हे माझ भाग्यच. ती दूरदर्शी होती, अभ्यासात व शिकवण्यातही पटाइत होती. तिच्याकडे    दांडगी   स्मरणशक्ती होती,  उतम व्यवस्थापन कौशल्य होत, हजरजबाबीपणा होता, तर्कशुद्ध विचार होते, आणि देवाने एवढी हुषारी दिली आहे -त