Posts

सामाजिक सुरक्षा लेख २ महिलांची सामाजिक सुरक्षा

सामाजिक सुरक्षा लेख २  http://epaper.evivek.com/epaper.aspx?lang=2025&spage=Mpage&NB=2017-12-31#Mpage_14 सामाजिक सुरक्षा व महिला  विवेक मराठी    26-Dec-2017 ***लीना मेहेंदळे*** आज भारतीय महिलांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे, ती धोक्यात आणणारे प्रमुख मुद्दे गुन्हेगारीत मोडतात. बलात्कार आणि स्त्रीभू्रण हत्या हे ते दोन विषय. हुंडाबळी, महिला कैदी, अनाथ बालिका, मतिमंद बालिका, देहव्यापारात फेकल्या गेलेल्या महिला, या आणि अशा अनेक महिलांना सामाजिक सुरक्षेची गरज आहे. महिलांच्या बाबतीत सामाजिक सुरक्षा, महिला सबलीकरण आणि गुन्ह्याचा बळी न होणे या तिन्ही बाबी एकमेकांशी एवढया निगडित आहेत की त्यांच्या सीमारेषा पुसलेल्याच आहेत. कोणती बाब सामाजिक सुरक्षेची आणि कोणती सबलीकरणाची हे ठरवणे कठीण आहे. एकूणच स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षेचे प्रश्न खूप आहेत व खूप गंभीर आहेत. त्यासाठी समाजप्रबोधन, संस्कार, विशेषतः एकत्र कुटुंबाचा व स्त्री सन्मानाचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. मागील लेखात सामाजिक सुरक्षेचा विचार करताना आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची थोडी दखल घेतली होती....

सामाजिक सुरक्षा लेख ३ बालकांचे प्रश्न सा.विवेक मराठी 07-Jan-2018

बालकांचे प्रश्न-एक दृष्टिक्षेप विवेक मराठी    07-Jan-2018 Also see in print at  http://epaper.evivek.com/epaper.aspx?lang=2025&spage=Mpage&NB=2018-01-07#Mpage_13 ** लीना मेहेंदळे*** सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून सरकारी तसेच खाजगी शाळांमधील मागास जातीतील, मागास जनजातीतील तसेच इतर मागासवर्गीय मुलींमुलांची फी माफ असून हा खर्च शासनातर्फे शाळांना अदा केला जातो. आता आर्थिकदृष्टया मागास ठरवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनादेखील हा फायदा मिळू शकेल. यामुळे अशा मुलांना शाळा जरी सुलभ झाली असली, तरी एकुणात शिक्षणाचा दर्जा घसरणे, नोकरीच्या बाजारात निव्वळ दहा वर्षांचे शिक्षण पुरेसे नसणे व मिळणारे शिक्षण हे जीवन जगण्याला शिकवू शकत नसणे यामुळे या सामाजिक सुरक्षा उपायाचे फलित पूर्णपणे मिळू शकत नाही.  भारतातील जनसंख्येपैकी एक पंचमाश म्हणजे वीस टक्के जनता 1 ते 10 या वयोगटात आहे. म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही वयोगटाच्या तुलनेत या गटाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल 11 ते 20 या वयोगटांत सोळा ते सतरा टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. देशाची भावी पिढी ती हीच. पण य...

राष्ट्रीय समृध्दीची ओळख, सामाजिक सुरक्षेचे चिंतन विवेक मराठी 18-Dec-2017

रा ष्ट्रीय समृध्दीची ओळख, सामाजिक सुरक्षेचे चिंतन विवेक मराठी    18-Dec-2017 आजच्या दिवसाला सामाजिक सुरक्षेची गरज कोणकोणत्या घटकांना आहे, त्यांची एक भली मोठी यादीच होईल. त्यामध्ये कायद्याने ठरवलेल्या गुन्ह्यांबाबत सुरक्षा, तसेच कायद्याने गुन्हा ठरवलेला नाही अशाही सामाजिक सुरक्षा मोजाव्या लागतील. त्याच्या उपाययोजनेमध्ये शासनाने काय केले किंवा करता येईल किंवा समाजाने काय केले व करता येईल, याचाही आढावा घ्यावा लागेल. आजचा काळ, आजची भारतीय व जागतिक परिस्थिती, भारतीय राज्यघटना आणि शासन प्रणाली, त्यामध्ये असलेल्या सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि त्याला समाजाचे लाभलेले किंवा न लाभलेले अधिष्ठान यांचा विचार करू या. व्यष्टी आणि समष्टी! मानवालाच नव्हे, तर सर्वच प्राण्यांना याचे भान असते. समष्टीलाच कधी निसर्ग म्हणतात, पर्यावरण म्हणतात तर कधी समाज म्हणतात. ज्या त्या चिंतनाच्या व्याप्तीनुसार समष्टीचा अर्थ ठरत असतो. व्यक्तिगत सुरक्षा हवी हे सर्वच सजीव प्राण्यांना जन्मत:च कळत असते. त्या दृष्टीने प्रत्येकाची वाटचाल सुरू असते. समष्टीचे भान थोडे उशिरा येते. कमी-जास्त प्रमाणात येते. हळूहळ...

बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई

बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई माझी आई - कशी होती ? याबद्दल जगांत कोणीच पूर्णपणे सांगू शकणार नाही कारण तिच्याबद्दल विचार करायला बसल की लक्षांत येत की आपण आपल्या आईला कधीच नीट समजून घेतल नाही . ती आयुष्यांत इतक्या सहजपणे असते आणि वावरते की आपल्याला तिला वेगळी व्यक्ति म्हणून ओळखताच येत नाही . माझी आई सौ. लीला बलराम अग्निहोत्री (बालपणातील लीला दत्तात्रेय नामजोशी) अशीच सहजपणे व प्रसन्नपणे आमच्या आयुष्यात वावरली. आईच थोडक्यांत वर्णन करायच तर सुंदर , बुद्धिमान , आरोग्यसंपन्न ,   गुरू ,  त्यागी ,  कष्टाळू , सत्यवचनी , समंजस ,   कृतज्ञता जोपासणारी , धीर देणारी , संस्कार घडवणारी अशी ती होती .  मला जीवनात भेटलेल्या बुद्धिमान व्यक्तिंमधे माझ्या आईचा क्रम खूप वरचा लागतो. तिच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू मला पहायला मिळाले, जाणीवेत उतरले आणि काही तर संस्कारातही उतरले हे माझ भाग्यच. ती दूरदर्शी होती, अभ्यासात व शिकवण्यातही पटाइत होती. तिच्याकडे    दांडगी   स्मरणशक्ती होती,  उतम व्यवस्थापन कौशल्य होत, हजरजबाबीपणा होता, तर्कशुद्ध वि...