मराठी बालसाहित्य - कुठे आहे, कुठे जायला हवे महाराष्ट्राच्या सुवर्ण-महोत्सव वर्षी मराठी महाराष्ट्राचा विचार विविध अंगांनी होत आहे. त्यांतला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाल साहित्य. पण अजून तरी याचा विचार कुणी केलेला दिसत नाही. साने गुरुजींनी म्हटले होते - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. बालसाहित्याबद्दल एवढे व्यापक आणि निर्णायक, तरीही पारिभाषिक असे विधान दुसरे कुणीच केले नसेल. बालसाहित्याचा विचार फक्त बालकांसाठी साहित्य या दृष्टीकोणांतून होऊ शकत नाही - तर उद्यांचा समाज, राष्ट्र आणि जग कसं असेल किंवा कसं असायला हवं, त्याच प्रतिबिम्ब आजच्या बालसाहित्यातून दिसत असल्याने बालसाहित्याचा विचार अत्यंत दूरदृष्टीने केला पाहिजे. मला चवथी पास झाल्यावर बक्षिस म्हणून अरेबियन नाईट्स हे पुस्तक वाचायला देण्यांत आले अणि पाचवीनंतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावण्यांत आली. या शिवाय बडील संस्कृत व तत्वज्ञानाचे प्रोफेसर आणि रिसर्च गाइड असल्याने घरांत महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं आदि पुस्तकांची रेलचेल होती. त्याच पुस्तकांच्या मुलांसाठी काढलेल्या आवृत्या पण आम्हीं विकत घेत गे...
Comments