विविधता आणि एकता

।। दास-वाणी ।।

अष्टधेचे जिनस नाना ।
उदंड पाहातां कळेना ।
अवघे सगट पिटावेना ।
कोणीयेकें  ।।

सगट सारिखी स्थिती जाली ।
तेथें परीक्षाच बुडाली ।
चविनटानें कालविलीं ।
नाना अन्ने  ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
 दासबोध : १७/१०/१४-१५

पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धी
आणि अहंकार अशा अष्टधा प्रकृतीच्या
घटकांच्या वेगवेगळया मिश्रणातून असंख्य
प्रकारचे जीव निर्माण झाले.
नामरूपात्मक विविधता इतकी प्रचंड आहे
की समजून घेण्याच्या आवाक्याबाहेर आहे.
कोणी एक जण हा सर्व विस्तार सलग
सांगू शकेल अशीही स्थिती नाहीये.

हे सर्व सारखेच आहे कारण ' सर्वं खलु इदं ब्रह्म । '
असे जर कोणी म्हटले तर तिथे परीक्षा किंवा
पारखच संपली.
ज्याला चवच वेगवेगळी अशी समजत नाही तो चविनट.
चव न समजणारा सर्वच प्रकारचे अन्न एकदमच
ताटामधे कालवतो. आनंदाने खातो सुद्धा !
गुणांची जाण नसते तो टोणपा.

वेगळेपण मानता कामा नये हे खरे परंतु
वेगळेपण जाणलेच पाहिजे हे ही तितकेच खरे  !

टोणपसिद्धलक्षणनाम समास.

Comments

Popular posts from this blog

एक शहर मेले त्याची गोष्ट

मी केलेले अनुवाद -- My Translations

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९