श्रीमती लीना मेहेंदळे ह्या एक कुशल प्रशासक, जागरूक विचारवंत आणि हिंदी व मराठी भाषेतील सिध्दहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे लेखनाचे विविध विषय आहेत राष्ट्र चिंतन, प्रशासन, समाज, बाल साहित्य, स्त्री-विचार, निसर्ग, ऊर्जा, विज्ञान आणि आयुर्वेद. आधुनिक भारतीय लेखकांच्या यादीत त्यांचे लेखन एक विशेष स्थानाचे मानले जाईल. महाराष्ट्रात जन्मलेल्या पण बिहारमध्ये शिकलेल्या व मोठ्या झालेल्या श्रीमती मेहेंदळे यांना संस्कृत तथा अन्य कित्येक भारतीय भाषांचे ज्ञान आहे. त्या एक उत्तम वाचक आहेत सोबत भाषांतर कलेतही त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे भाषांतरामधे त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. मेहेंदळे यांनी आजपर्यंत चारशेपेक्षाही अधिक समाज प्रबोधनावर लेख लिहिलेले आहेत. त्या एक उत्तम वक्ता असून जनसामान्यांपुढे वेळोवेळी प्रशासन संदर्भात त्यांनी शंभरपेक्षाही अधिक भाषण दिलेली आहेत. मराठी वृत्तपत्रात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, गांवकरी व हिंदी वृत्तपत्रात नभाटा, जनसत्ता, हिंन्दुस्तान, महानगर, प्रभात खबर, देशबन्धु आणि मासिक पत्रिकांमध्ये अंतर्नाद साप्ताहिक सकाळ, कथादेश, इंद्रप्रस्...