2/01 शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केंद्र हवे खेडे
शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केंद्र हवे खेडे कोल्हापूर सकाळ (४१) २७.३.८५ (इथे विचारांना वाव आहे या माझ्या लेखांच्या संकलनांत) आपला भारत हा एक अतिशय विस्तृत असा देश आहे आणि त्यांत सर्व प्रकारची भौगेलिक स्थित्यतरे, व भाषात्मक स्थित्यंतरे बघालया मिळतात. एवढे सगळे असूनही हा एक अतिशय एकसंघ असा देश आहे. या देशाची संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली व म्हणूनच सर्वत-हेच्या समाजाना, सर्व त-हेच्या विभागांना एकत्र बाधून ठेवणारी अशी आहे. अशा या संस्कृतीत शिक्षणाला काय महत्व दिले जाते, याचा ऐतिहासिक आढावा घ्यायचाच असेल तर आपल्याला येट भगवद्गीतेपर्यंत जाता येते आणि 'न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विद्यते' असा साक्षात् भगवंताचाच पुरावा देता येतो. म्हणून शिक्षणाचा प्रसार, प्रचार हा या राष्ट्राच्या समृद्धीचा एक मापदंड मानला पाहिजे. नुकतेच पंतप्रधानांनी सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण पद्धती बदलण्याची व त्यामधे काही चांगले बदल करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले आहे. या संदर्भात आपल्याला काय प्रकारचे बदल हवेत व ने कसे उपकारक ठरतील हे तपासून बघणे योग्यच होईल. सध्याचा शिक्षण पद्धतीतले जे दो...