Posts

Showing posts from April, 2019

मनोहर पर्रिकर – एक तडफदार प्रशासक

मनोहर पर्रिकर – एक तडफदार प्रशासक मनोहर पर्रिकर एक तडफदार प्रशासक     विवेक मराठी    22-Apr-2019 श्री मनोहर पर्रिकर यांना जाऊन सुमारे महिना लोटला . या निमित्ताने माझ्या गोवा वास्तव्यातील त्यांच्या बाबतच्या कांही आठवणी नक्कीच सांगण्यासारख्या आहेत . माझ्या भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्तिनंतर मार्च २०१० मधे मी केंद्रीय प्रशासनिक ट्रिब्यूनल ( CAT) मधे पोस्टिंग स्वीकारली . त्या काळात माझे लेखनकार्य जोरात होते . केंद्र शासनाचा माहितीचा कायदा देशभरात सन् २००५ मधे लागू झाला त्यावर मी फिदा होते . त्याआधी राजस्थान , गोवा , महाराष्ट्र , तमिळनाडु या राज्यांनेही असेच उद्दिष्ट ठेऊन एकेक कायदा केला होता . पण ते फारसे उ पयोगी न सल्याचे माझे मत होते कारण ज्या अधिकाऱ्याकडे माहिती मागितली असायची त्याच्याकडेच प्रश्न विचारणाऱ्याला माहिती द्यायची की नाही हे ठरविण्याचे बरेच निकष व बरेच अधिकार असत . केंद्राचा नवा कायदा मात्र प्रभावशाली कायदा होता व देशभर लागू झाला होता . सबब इतर राज्यांनी केलेले व