एक शहर मेले त्याची गोष्ट flap matter

श्रीमती लीना मेहेंदळे ह्या एक कुशल प्रशासक, जागरूक विचारवंत आणि हिंदी व मराठी भाषेतील सिध्दहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे लेखनाचे विविध विषय आहेत राष्ट्र चिंतन, प्रशासन, समाज, बाल साहित्य, स्त्री-विचार, निसर्ग, ऊर्जा, विज्ञान आणि आयुर्वेद. आधुनिक भारतीय लेखकांच्या यादीत त्यांचे लेखन एक विशेष स्थानाचे मानले जाईल. महाराष्ट्रात जन्मलेल्या पण बिहारमध्ये शिकलेल्या व मोठ्या झालेल्या श्रीमती मेहेंदळे यांना संस्कृत तथा अन्य कित्येक भारतीय भाषांचे ज्ञान आहे. त्या एक उत्तम वाचक आहेत सोबत भाषांतर कलेतही त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे भाषांतरामधे त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे.

मेहेंदळे यांनी आजपर्यंत चारशेपेक्षाही अधिक समाज प्रबोधनावर लेख लिहिलेले आहेत. त्या एक उत्तम वक्ता असून जनसामान्यांपुढे वेळोवेळी प्रशासन संदर्भात त्यांनी शंभरपेक्षाही अधिक भाषण दिलेली आहेत. मराठी वृत्तपत्रात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, गांवकरी व हिंदी वृत्तपत्रात नभाटा, जनसत्ता, हिंन्दुस्तान, महानगर, प्रभात खबर, देशबन्धु आणि मासिक पत्रिकांमध्ये अंतर्नाद साप्ताहिक सकाळ, कथादेश, इंद्रप्रस्थ, अक्षरपर्व, समकालीन साहित्य, बालभारती, देवपुत्र, नंदन, स्नेह इत्यादि मध्ये अविरत लेखन करीत आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवि श्री. कुसुमाग्रज यांच्या 108 कवितांचे सुंदर आणि समर्थ भाषांतर मेहेंदळे यांनी केलेले आहे. त्या व इतर अनेक कवितांचे हिंदी व मराठी भाषांतर त्यांच्या वेबसाईटव ब्लॉग वर उपलब्ध आहे.

आज हिंदी भाषेबरोबरच सर्व भारतीय भाषा इंग्रजी भाषेच्या तुलनेत मागे पडलेल्या आहेत. त्यांना पुढे कसे आणता येईल यासाठी संगणकाच्या सुविधांबाबत श्रीमती मेहेंदळे ठोस उपाययोजना करीत आहेत. त्यांनी ऊर्जा व सुरक्षा या विषयावर तीन वर्षे चाललेल्या बूँद बँूद की बात (रेडिओ) आणि खेल खेल में बदलो दुनिया (दूरदर्शन) या साप्ताहिक मालिकांचे आयोजन व संपादन केले. त्या आकाशवाणी व दूरदर्शनवर ब-याच कार्यक्रमांत नियमित सहभागी असतात.

त्यांच्या बहुविध प्रतिभेचे दर्शन व लेखनातील वेगळेपणा त्यांच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या वीस पुस्तकातून प्रत्ययाला येतो.

एक शहर मेले त्याची गोष्ट हा त्यांच्या भाषांतरित कथांचा (कांही कथा त्यांच्या) दुसरा संग्रह आहे.

--- XXX ---

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९