खिंडीच्या पलीकडे --Khindichya Palikade -A novel



तू सांगितलेला प्रवास शेवटच्या खिंडीपर्यंत घेऊन जातो. किती विचित्र आहे हा प्रवास. एखाद्याने तो पटपट संपवू म्हटला तर संपत नाही, खोडकर ढग नकोत म्हटलं तर ढगांची दरी संपत नाही, आणि खेळकर ढगांसोबत खेळायचय म्हटलं की प्रवास संपून जातो. पण तू मला पुढची गोष्ट सांग ना।
हे पंच लोकांना काहीही सांगतात. मी प्रवासाला जाईन ना तेंव्हा लोकांना सांगेन त्यांचं ऐकू नका, माझं ऐका...... म्हणजे तू पण त्यांच्यासारखाच होणार तर?..... नाही, नाही, तसं नाही, पण मग पंचाची चलाखी कशी संपवायची?...... एकच उपाय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं.
सगळे मला सांगतात कुणी तरी हो.... पण कुणीही नाही झालं तर?.... कुणीही न होणं म्हणजे उन्मुक्त स्वर, पक्ष्यांचं मंजुळ गाणं, सुगंधाचा स्त्रोत....
आणि शेवटच्या खिंडीपलीकडे कांय आहे? कारण प्रवास तर तिथेही थांबत नाही. सांग ना।

khindichya palikade -- A novel
Here is the book
Translated from Ravindra Nath Prasher's English Novel THE LAST PASS
Published in Lokmat, Nashik, Diwali 2002?

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९