एक शहर मेले त्याची गोष्ट
एक शहर मेले त्याची गोष्ट सोळाव्या शतकाने डोळे उघडून आळोखे-पिळोखे दिले आणी पृथ्वीकडे नजर टाकली. एक मोठा - डोंगरपट्टा दिसला. त्यावर घनदाट अरण्य. त्यातच एक मोठा झुपका हिरडयांच्या झाडांचा - शेजारी एक छोटी वस्ती. सोळाव्या शतकाने त्या वस्तीकडे रोखून पहात म्हटले - इथे कांही तरी वेगळ घडेल. वस्तीच्या पूर्वकडे घनदाट जंगल होत बहुतांशी हिरडयाची झाड, पण इतरही चिकार जाति होत्या मोठे वृक्ष - तीन चारशे वर्ष आयुष्य असणारे - छोटी झुडप, लता, वेली, गवतांचे किती तरी प्रकार. प्रत्येकाचे आयुर्मान निराळे. प्रत्येकाचे ज्ञान तंतु निराळे, स्वभाव निराळा. वस्तीच्या पश्च्िामेला शेती होती. तिथे बहुतांशी बाजरी पिकायची. कधी कधी थोडी तूर, थोडे चणे, थोडे तीळ उगवले जात. शेताच्या बांधावर कुठे लिंब, कुठे बाभळी ! कुणी आंबा लावला असेल, कुणी चिंच, तर कुणी चक्क सागवान पण बांधावरच्या झाडांवर सगळया गांवाचा वाटा असायचा. कुणाला चटणीसाठी चिंच हवी असेल तर काळूच्या बांधावरुन घेऊन यायची कुणाला दात घासायला बाभळीची काडी हवी असेल तर पुढे नामदेवाच्या शेतात जायच. भाजीपाला आणी फुलं पण शेतात पिकवत नसत. प्रत्येकाच्या परसात कांही ना कांही ल...
Comments