परीक्षा झाली तणावाची घोडा अडला

परीक्षा झाली तणावाची घोडा अडला
... लीना मेहेंदळे

अकबर बिरबलाच्या गोष्टींमध्ये ही एक छानशी गोष्ट आहे. अकबराने आपल्या दरबा-यांना चार प्रश्नांच एक कोड टाकल. उत्तर एकाच ओळीत द्यायचे होते.

त्याने विचारले -
  • रोटी क्यूँ जली ?
  • विद्या क्यूं गली ?
  • पानी क्यूँ सडा ?
  • घोडा क्यूँ अडा ?


नेहमी प्रमाणे बिरबलाने खूप वेळ वाट पाहिली. इतर दरबाऱ्यांना संधी दिली. आणि कोणालाच उत्तर येत नाही असे पाहून त्याने कोडयाचे उत्तर तीनच शब्दात सांगितले. - फेरा था

फेरा - म्हणजे फिरवणे, उलटणे, गतीशील ठेवणे.
तव्यावरची पोळी उलटली नाही तर जळते, विद्या शिकत-शिकवत राहिली नाही तर असलेली सुद्धा विस्मृतीत जाते. पाणी एकाच ठिकाणी साठवून राहिले तर सडते, त्यामध्ये किडे, डास, शेवाळ . साठतात. खळखळून वाहणारे पाणी शुध्द होत राहत. घोडा एकाच ठिकाणी बांधून ठेवला, त्याला फिरु दिलं नाही तर त्याचं पाय आखडतात. मग गरजेच्या वेळी तो धावू शकत नाही, तो अडतो. या सर्व समस्यांचे उत्तर एकच - त्यांना हलतं, फिरत ठेवणं, वेळच्या वेळी उलटणं थोडक्यात त्यांचेकडे लक्ष देवून त्यांची क्षमता कमी होत नाही ना? हे पाहण. आपल्या आजूबाजूलापण अशी फेरा नसल्याची खूप उदाहरण दिसतात. अभ्यासाची उजळणी करणे, रस्ते, इमारती, नदीचे बांध, कालवे यांची वेळेवर दूरुस्ती करणे. आपण कामात किती मागे पडलो? ते तपासून पाहणे. आपल्या नियमात काय दुरुस्त्या करण्याची गरज आहे? याचा विचार करणे. ही सर्व फेरा नसल्याचीच उदाहरणे आहेत.
आपल्याकडे सुमारे दीडशे वर्षोपासून चालत आलेला एक नियम नव्या युगाच्या दिशेने बदलला तर, विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? त्यांचा व पालकांचा ताणतणाव वाचेल, त्यांना परीक्षा-संकट, निराशा आत्महत्या अशा समस्या येणार नाहीत. कसा ते पाहू.
आपल्या परिक्षा होतात, त्यासाठी कोणीतरी शिक्षक पेपर सेट करतात. ही एक मोठी डोकेदुखीच असते. म्हाणून वर्षाला कसाबसा एक पेपर सेट केला जातो. परिक्षेला सुमारे दहा लाख पेक्षा जास्त विद्यार्थी असतात एवढया सर्वांसाठी एकच पेपर्स छापायचे. ते फुटू नयेत म्हणून खूप काळजी घ्यायची. पेपर एकदाच सेट करायला लागायचा एकदाच छापायला लागायचा म्हणून सगळया विद्यार्थ्यांची परिक्षा एकदम घ्यायची. हे सगळे नियम 1850 मध्ये आपल्याकडे शाळा आणि परिक्षेची पध्दत लागू झाली तेव्हापासून चालत आले आहेत. दीडशे वर्षे लोटली. पूर्वी देशभरात काही हजार मुले परिक्षा देत. आता काही कोटी मुले परिक्षा देतात. म्हणजे यंत्रणेवर केवढा ताण येत असेल पहा. विद्यार्थ्यांवर तर भयानकच ताण असतो. अगदी आत्महत्येपर्यंत.
आता विचार करा. आता संगणकाचे युग सुरु झाले आहेत. संगणकाला आपण खूपसे (म्हणजे समाजा पाच, दहा हजार) प्रश्न सांगून ठेवले, तर तो त्यांची उलटसूलट जुळणी करुन आपल्याला हवी तेव्हा एक प्रश्नपत्रिका तयार करुन देवू शकातो. त्याला सांगायचे, आपल्याला चवथीच्या लायकीचा पेपर हवा कि नववीच्या, कि बारावी किंवा चौदावी ? तेवढच आपण संगणकाला सांगायचे, तसेच भूगोलाचा पेपर हवा कि गणिताचा ? किंवा इतर कुठल्या विषयाचा, ते ही सांगायचे. अशा -हेने सोय केली तर दर महिन्याला परिक्षा घेता येतील. कितीही वेळा परिक्षेला बसलं तरी चालेल, आपल्या सोयीने आपल्याला अभ्यास झालेला आहे असे पटेल तेव्हा. मग शिक्षकावर जबाबदारी फक्त उत्तर पत्रिका तपासण्याची. तेव्हा एकदम चार / पाच लाख नाही, तर थोडे थोडे. अशा -हेने हवे तेव्हा जावून हव्या त्या विषयाची परिक्षा देवून टाकता आली तर सगळे भयानक ताण कमी होतील की नाही ? मग आपण आपलं पहिली ते बारावी फक्त पुढच्या वर्गात सरकत रहायचं. दरवर्षी मार्चमध्येच सगळया परिक्षांचा ताण असले काही नाही. हवे तेव्हा, हव्या त्या, परिक्षा आटोपून टाकायच्या.
पहाच विचार करुन, आवडेल का अशी पध्दत ?

**************



Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट