६५ व्या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने

साप्ताहिक विवेक
तारीख: 24 Jan 2015 15:01:25
****लीना मेहेंदळे****
दर वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कीदेशात दीर्घकाळ चालणाऱ्याअबाधित चालणाऱ्या ज्या सुव्यवस्था असायला पाहिजेत व जपायला पाहिजेतत्यांची आठवण करून देण्यासाठी आपण स्वातंत्र्यदिनापेक्षा वेगळा असा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या सुचारूपणाने टिकवायच्या शासनव्यवस्थेला साजेशी - किंबहुना आवश्यक अशी कौशल्ये आपल्यापाशी आहेत कायाची नोंद दर वर्षी घेतली पाहिजे. आपल्या शासनव्यवस्थेत अगदी छोटया-छोटया मुद्दयांवरदेखील सुधारणा व टिकाऊपणाच्या व सुचारूपणाच्या निकषावर उतरणाऱ्या सुधारणा आवश्यक आहेत.
तुम्ही कधी कार चालवली आहेज्यांनी चालवली असेलत्यांना माहीत आहे कीचौथ्या-पाचव्या गियरमध्ये गाडी असेल तर दर किलोमीटरसाठी खर्च होणारे पेट्रोल कमी लागते. पण गाडी पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या गियरमध्ये असेल तर पेट्रोल कंझम्शनचा दर जास्त असतो. म्हणजे इंजिन एफिशिएन्सी कमी असते. याच्या टेक्निकल कारणांमध्ये जाण्याची गरज नाही. पण दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एक - तुम्ही पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या गियरचा टप्पा ओलांडल्याशिवाय चौथ्या गिअरमध्ये जाऊ शकत नाही. दुसरी - तुम्ही हरप्रयत्नाने चौथा गियर टिकवलाखालच्या गियरमध्ये जाण्याची वेळ येऊ दिली नाहीततर तुम्ही चांगले ड्रायव्हर. मात्र खूपदा गर्दीमुळे किंवा रस्त्याच्या दशेमुळे तुम्हाला खालच्या गियरमध्ये जावेच लागते.. किंवा तुम्ही कधी एखादा नवा उद्योग उभारलायत्याच्या उभारणीच्या पहिल्या दोन-तीन वर्षांतील काळात करावी लागणारी कामेत्यांचे समय व्यवस्थापनत्यातील प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी तज्ज्ञता हे सर्व भिन्न असते आणि एकदा प्रकल्प उभारणी पूर्ण होऊन उत्पादनाला सुरुवात झाली की त्यासाठी लागणारी तज्ज्ञताप्रक्रिया आणि समय व्यवस्थापन हे पूर्णपणे वेगळे असतात.
हा मुद्दा इतक्या स्पष्टपणे मांडण्याचे कारण असे कीआपल्या देशात सध्याच्या शिक्षण पध्दतीत तसेच शासन पध्दतीत एक विषय पूर्णपणे दुर्लक्षिलेला आहेतो म्हणजे 'टिकाऊपणाचे शास्त्रहा विषय.
गेल्या पासष्ट-सत्तर वर्षांत शासनाने आणि समाजाने कित्येक नव्या गोष्टी निर्माण केल्या. रस्ते बांधलेसिंचन प्रकल्प पूर्ण केलेशाळा-दवाखाने बांधलेसंस्था उभारल्याअगदी ग्रामपंचायतजिल्हा परिषदनगरपालिकांसारख्या राजकीय,प्रशासकीय संस्था असतील अगर सीएसआयआर व त्याअंतर्गत असणाऱ्या पन्नासच्या आसपास वैज्ञानिक शोधसंस्था असतील,साखर आणि सूत गिरण्यांसारखे सहकारी कारखाने किंवा सहकारी बँका असतीलसाहित्य महामंडळे किंवा अकादमी असतील,विद्यापीठे असतील किंवा आणखी नवीन काही प्रकल्प असतील - त्या नव्याच्या उभारणीपुरतेच शासनाने लक्ष घातले आहे. किंबहुना तेवढेच लक्ष शासनाला पुरवता आलेले आहे. पुढे त्या संस्था सुचारू व अबाधितपणे चालतील आणि त्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट गाठतील याकडे शासनाचे व समाजाचे दुर्लक्ष आहे. मुख्य म्हणजे अशा सुचारूपणे चालण्यासाठी लागणारे कौशल्य आणि तज्ज्ञता वेगळया प्रकारची असावी लागतेयाचीच जाणीव कुणाला नाही असे चित्र दिसून येते.
येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा विषय मांडण्याचे कारण आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे त्या प्रकल्प उभारणीतील काळासारखे किंवा आपली कार स्टार्ट करून पहिल्या गियरमध्ये टाकण्यासारखे आहे. स्वातंत्र्य मिळाले. एक खूप मोठा,किंबहुना सर्वात मोठा व सर्वात महत्त्वाचा पल्ला गाठला गेलापण पुढे त्याचे टिकाऊपणत्याचे अबाधित राहणेत्याचे सुचारू असणे यांचे कायत्यासाठी लागणारी तज्ज्ञता वेगळीव्यवस्थापन वेगळेकौशल्य वेगळेत्यातील प्रक्रियाप्रोसीजर्स वेगळया,इतकेच नव्हेतर त्यामागील तत्त्वचिंतनही वेगळी असतेअसावे लागते. म्हणून मग ते काय असेलकसे असेल हा अभ्यास सुरू झाला आणि दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सतत त्याच कामाचा ध्यास घेऊन व समर्पित भावनेतून एका मोठया विद्वत गटाने हे काम पूर्ण केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी राष्ट्राला समर्पित केले.
काय नाही या पुस्तकात म्हणजे राज्य घटनेतअगदी प्रारंभीच सर्व भारतीयांनी आपल्या देशासाठीदेशबांधवांसाठी आणि मानवतेसाठी केलेली प्रतिज्ञा आहे कीआम्ही सर्व न्यायस्वातंत्र्यसमता व बंधुत्व या आदर्शांसाठी ही घटना अंगीकारत आहोत आणि मग पुढे हे चारही आदर्श प्रत्यक्ष व्यवहारात उतरण्यासाठी देशातील व्यवस्थापन कसे असेल त्याची चर्चा आहे.
आपली घटना तयार होण्याआधी देशात शासनव्यवस्था नव्हती कानक्कीच होतीपण ती ब्रिटिश शासनव्यवस्था होती. ती ब्रिटिश राज्यव्यवस्थेच्या अधीन होती व त्यातील कित्येक कायदेकानून त्या व्यवस्थेशी सुसंगत पण नवीन स्वतंत्र देशाच्या अस्मितेशी विसंगत असे होते. त्यांना बदलायचे तर ते कसेदेशांतील जनतेला न्याय व स्वातंत्र्य असेलतर त्यांचे वेगवेगळे पैलू व आयाम काय असतीलदेशात समता व बंधुभाव आणावा यासाठी काय करावे लागेल किंवा केले जाईलअगदी देशाचे नावभूगोलध्वजचिन्ह काय असतील इथपासून तर सैन्यदलपोलीस दलन्यायव्यवस्थाविधिमंडळ व्यवस्था, याबाबत साधक-बाधक चर्चेनंतर घेतलेले निर्णय असे सर्व काही घटनेत आहे. देशातील नवनिर्माणाच्या व सुचारूपणे चालणाऱ्या पध्दती काय काय व कशा कशा असतील ते आहे. पुढील काळातही शासन कोणत्या उद्दिष्टांसाठी झटत राहील त्याचा दिशानिर्देश आहे आणि नागरिकही कर्तव्यबुध्दीने वागून कोणत्या सामाजिक विकासात हातभार लावतील त्याचाही दिशानिर्देश आहे.
दर वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कीदेशात दीर्घकाळ चालणाऱ्याअबाधित चालणाऱ्या ज्या सुव्यवस्था असायला पाहिजेत व जपायला पाहिजेतत्यांची आठवण करून देण्यासाठी आपण स्वातंत्र्यदिनापेक्षा वेगळा असा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या सुचारूपणाने टिकवायच्या शासनव्यवस्थेला साजेशी - किंबहुना आवश्यक अशी कौशल्ये आपल्यापाशी आहेत कायाची नोंद दर वर्षी घेतली पाहिजे. आपल्या शासनव्यवस्थेत अगदी छोटया-छोटया मुद्दयांवरदेखील सुधारणा व टिकाऊपणाच्या व सुचारूपणाच्या निकषावर उतरणाऱ्या सुधारणा आवश्यक आहेत. उदा. शाळा इमारती बांधण्यासाठी 10 कोटी खर्च केल्यावर आपण किमान दहा लाख तरी येथील शिक्षकांच्या प्रशिक्षणावरचांगल्या पुस्तकांच्या निर्मितीवर किंवा प्रयोगशील शिक्षकांचे कौतुक करण्यावर खर्च करतो का?कोटयवधी रुपयांची उपकरणे आणल्यानंतर ती चालवण्यासाठी स्टाफ देण्यात आपण कमी पडतो काअब्जावधी रुपये खर्च करून सिंचनबांध बांधल्यावर काही लाख रुपये खर्च न केल्यामुळे कालवे खोदले जात नाहीत व शेतकऱ्याला पाणी मिळत नाही हे आपण ध्यानात घेतो काकोटयवधी रुपये खर्च करून शासन शेतकऱ्यांकडील धान्य विकत घेते आणि ते FCIच्या गोदामांमध्ये साठवले जातेपण तिथल्या अधिकाऱ्यांनी 'टिकाऊपणाच्या शास्त्रा'कडे दुर्लक्ष केल्यामुळे दर वर्षी हा धान्यसाठा सडत राहतो आणि वाया जातो. याबद्दल आपल्याकडे चीडसंताप येतो का?

आपण स्वातंत्र्यदिन 'साजराकरतो 'दिवाळीसाजरी करतो त्याप्रमाणे! दिवाळीत कसे आपण नरकासुर वधाची कथा आठवतो,बळीराजाची कथा आठवतोयमाची कथा आठवतोत्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी लढलेल्या स्वातंत्र्यलढयाची आठवण करतो. पण प्रजासत्ताक दिन हा फक्त 1950मधील 30 जानेवारीच्या भारतीय संसदेमधील उदात्तभव्य आणि अविस्मरणीय दिवसाची आठवण असा नसावातर स्वातंत्र्य टिकवण्यासाठी व सुचारूपणे उपभोगण्यासाठी आपण सुदूर भविष्यकाळापर्यंत जे टिकाऊपणाचे शास्त्र शिकले पाहिजे व बाणवले पाहिजेत्याची आठवण ठेवून करू या.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९