Posts

Showing posts from 2015

अँडव्हाण्टेज गोवा --- हा टिकणार का?

अँडव्हाण्टेज गोवा-- हा टिकणार का? गेली वर्ष दीड वर्ष नोकरीनिमित्त गोव्याला वास्तव्य करण्याचा योग आला. त्यामुळे इथले समाजजीवन जवळून पाहता आले आणि त्यातूनच गोव्यातील समाजमनाचे वेगळेपण जाणवले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे किंवा कर्णाटकातील बंगळूर या मेगा व मेट्रो शहरांच्या तुलनेत गोव्यातील प्रत्येक शहर हे लहानच म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांच्या सारखे "फास्ट" जीवन नसून इथल्या जीवनाला एका शांत प्रवाहासारखा संथपणा आहे. गोंय समाजाची सांगता येण्यासारखी वैशिष्ठ्ये आहेत, व ती गोंयकरांना इतर प्रातीयांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरवतात असे म्हणायला हरकत नाही. यालाच मी अँडव्हाण्टेज गोवा म्हणते. त्यातील सर्वात मोठा अँडव्हाण्टेज म्हणजे साक्षरता आणि शिक्षण. गोव्यातील साक्षरता ९५ टक्क्याच्या आसपास आहे आणि शाळकरी वयातील कोणतीही मुलगी किंवा मुलगा घरी बसत नाही. त्यामुळे शिक्षणाची किमाण पातळी ही आठवी पर्यंतची आहे. महाराष्ट्रात १०० ते ११० टक्के पहिलीचे एनरोलमेंट असूनही गळतीला  दुसरी तिसरीपासूनच झपाट्याने सुरूवात होते. गोव्यातील शालेय गळती ही त्या तुलनेने अगदी नगण्य आहे. ...

डूबेंगे शर्ममें बारबार -- (दिल्ली गँगरेप केस)

डूबेंगे शर्ममें बारबार -- ( दिल्ली गँगरेप केस ) दिल्ली एक बार फिर शर्म में डूबी। " निर्भया " के गँगरेप के मुद्देपर फिर हाहाकार हुआ -- चूँकि संसद चल रही थी तो कई सांसदों को अपना दुख , क्रोध , हतबलता व्यक्त करने का मौका मिला। लेकिन मैं चाहती हूँ और देश चाहता है कि इतनेभरको कर्तव्यपूर्ती समझकर चुप मत बैठो। आज संसदमें लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार है , काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी है , विपक्ष नेता सुषमा स्वराज है। कल तक राष्ट्रपति प्रतिभा पाटील थी , इनसे मैं कहूँगी -- आज लम्बेचौडे प्लान बनानेका , नया कानून गढनेका वक्त नही है। जो कानून हैं , उन्हें शीघ्रतासे क्रियान्वित करनेकी जरूरत है। वह नही हो रहा इसी कारण राष्ट्रपति भवनके सामने इतने विशाल प्रदर्शन के बाद भी देशभरसे अन्यान्य बलात्कार की घटनाएँ सामने आ रही हैं। शीघ्र क्रियान्वयन के अजेंडे में पीडितोंका बयान और पकडे गये आरोपियोंका भी बयान मॅजिस्ट्रेट के सामने दर्ज कराना सबसे प्रमुख आवश्यकता है -- क्योंकि इसी खामी के कारण कई मुकादमोंमें सजा नही हो पाती है। दूसरी आवश्यकता है कि जब भी ऐसा कांड हो , तब उसका तत्काल सं...

अच्युतराव आपटे --स्मरणिकेसाठी (२०००)

26.2.2000 अच्युतराव अच्युतराव आपटे गेल्याची बातमी आली ती मनाला चटका लावतच . पुण्याहून मिस्टरांनी फोन करुन सांगितल - वाईट बातमी आहे - तेंव्हा मनात पहिली शंका हीच आली . त्यांची प्रकृति अगदी हळू हळू खालावत होती . तरीही मन व चिंतनपर बुद्धि शेवटपर्यंत खंबीर होते - म्हणूनच ऐवढ्या लवकर ते जातील अस वाटल नव्हत . अच्युतरावांचा आणि माझा परिचय गेल्या पंचवीस वर्षांचा होता . वयाने व मानानेही ते खूप मोठे होते . तरी पण त्यांना काका वगैरेम्हटलेल आवडत नसाव . कधीही अचानक येई - “ मी अच्युतराव आपटे बोलतोय् .” त्यामुळे मनात तोच संदर्भ ठसला . खरे तर अच्युतराव हे माझ्या वडिलांचे सहपाठी . मला हे आधी माहीत नव्हते . ते त्यांनीच सांगितले . पुढे माझे वडील पुण्याला आल्यावर त्यांच्या गाठीभेटी घडत . पण मला नेहमीच त्यांनी एक स्वतंत्र व्यक्ति म्हणू वागवले . माझा व त्यांचा परिचय मी पुण्याला सर्वप्रथम पोस्टिंगवर प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर म्हणून आले तेंव्हाचा . शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात - मुलांना अगदी सुरुवातीपासून कौशल्य शिक्षण - स्किल एज्युकेशन द्यावे . वगैरे पुष्कळ विचार तेंव्हापासून मनात येत होते ....
Image
६५ व्या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने साप्ताहिक विवेक तारीख: 24 Jan 2015 15:01:25 ****लीना मेहेंदळे **** दर वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ,  देशात दीर्घकाळ चालणाऱ्या ,  अबाधित चालणाऱ्या ज्या सुव्यवस्था असायला पाहिजेत व जपायला पाहिजेत ,  त्यांची आठवण करून देण्यासाठी आपण स्वातंत्र्यदिनापेक्षा वेगळा असा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या सुचारूपणाने टिकवायच्या शासनव्यवस्थेला साजेशी - किंबहुना आवश्यक अशी कौशल्ये आपल्यापाशी आहेत का ?  याची नोंद दर वर्षी घेतली पाहिजे. आपल्या शासनव्यवस्थेत अगदी छोटया-छोटया मुद्दयांवरदेखील सुधारणा व टिकाऊपणाच्या व सुचारूपणाच्या निकषावर उतरणाऱ्या सुधारणा आवश्यक आहेत. तु म्ही कधी कार चालवली आहे ?  ज्यांनी चालवली असेल ,  त्यांना माहीत आहे की ,  चौथ्या-पाचव्या गियरमध्ये गाडी असेल तर दर किलोमीटरसाठी खर्च होणारे पेट्रोल कमी लागते. पण गाडी पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या गियरमध्ये असेल तर पेट्रोल कंझम्शनचा दर जास्त असतो. म्हणजे इंजिन एफिशिएन्सी कमी असते. याच्या टेक्निकल कारणांमध्ये...

आटपाट देशांतील टोल संस्कृतच्या पाऊल खुणांची

Jan 1 2011 आटपाट देशांतील  टोल संस्कृतच्या पाऊल खुणांची       आटपाट देश होता- त्याचे नांव भारत. तिथे हर दोन- तीन वर्षांनी पूर यायचा किंवा दुष्काळ यायचा. लोक म्हणू लागले हा ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव दिसतोय. चला रे चला, ग्लोबल वॉर्मिंग थांबवू या. मग त्या देशांत खूप उत्सव होऊ लागले. “ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी उत्सव”. उत्सवांसाठी निवडलेल्या दिवसांना सुंदर- सुंदर नांवे देण्यांत आली- कधी वसुंधरा- दिवस, कधी-खाद्य- आपूर्ति- दिवस, तर कधी उर्जा संरक्षण दिवस.     लोक मोठ्या संख्येनेया उत्सवांना हजेरी लावत. रंगीबेरंगी कपडे घालून व रंगी बेरंगी फुगे हाती घेऊन लोक येत. ज्यांना घरूनच फुगे आणता आले नसतील अशांना सोईसाठी उत्सव- स्थळाच्याघरावरच फुगे विक्रीची सोय असायची. शिवाय त-हेत-हेचे खाद्य पदार्थ, गृहशोभेच्या वस्तू पण विक्रीसाठी असायचे.झोपाळे कांय, जायंट व्हील कांय, सर्व असायचे. उत्सव दिवसाबरोबरच कधी कधी ग्लोबल वार्मिंग थांबवण्यासाठी फ्रेंडली क्रिकेटमॅच पण खेळल्याजात- त्या पहायला देखील लोक गर्दी करत. घरी परत जातांना सर्व जण त्या आनंदोत्सवांची प्रशंसा करीत आणि आता ग्...