Aniruddha Phalnikar wrote FB

Aniruddha Phalnikar December 21 at 9:39am FB Report wrote
लीनाताई, एक विवेकी प्रशासकीय अधिकारी या नात्याने जैतापूर प्रकल्पाबद्दल आपलं काय मत आहे? तो व्हावा की न व्हावा? राजकीय नेते आपली राजकीय सोय बघून भूमिका घेताहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आणि प्रकल्पाला अनुकुल असणा-या गटात आणि विरोधी गटातही बिगरराजकीय पण हुशार मंडळी आहेत. पण आम्ही नेमका कोणावर विश्वास ठेवावा? आणि कशाच्या आधारे?
------------------------------------------------------------------------------------------------------------
Leena Mehendale December 21 at 5:40pm
प्रकल्पाला अनुकुल असणा-या गटातही बिगरराजकीय पण हुशार मंडळी आहेत -त्यांचा मुख्य मुद्दा असा की आपल्या कडील पृथ्वीच्या पोटातील इंधनाचा साठा म्हणजे पेट्रोल, गॅस, कोळसा इ. येत्या 20 वर्षांत संपणार असल्यामुळे अणुप्रकल्प अटळ आहेत म्हणून जैतापूर प्रकल्प हवाच. प्रकल्पाला अनुकुल नसणा-या गटातील बिगरराजकीय पण हुशार मंडळींचा मुद्दा आहे कि -- एकाचा विकास म्हणजे दुसरा भकास होत असेल तर ते कसे चालेल.
माझे मत असे कि विकास विकास ओरडणारी मंडळी दुसरे भकास होण्याबाबत कधीही साधा खेद-खंतही व्यक्त न करता हे अटळ आहे हाच घोशा लावतात म्हणून ते अनैतिक तर आहेच, शिवाय हे अटळ असल्याचा दावाही बराचसा फोल आहे, पण आज तो दावा योग्य वाटतो याचे कारण काही राजकीय लोकांच्या स्वार्थाला अंत नाही. उदा... पुण्याचे पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारले तर गाड्या विकून कलमाडी यांना मिळणारे कमिशन किंवा टाटा-बजाज गाड्यांचा खप कमी होईल म्हणून यांना ते नको आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
Aniruddha Phalnikar December 21 at 7:44pm Report
यासाठी मी आ.संजय केळकरांना सांगितलं होतं की तुम्ही जैतापूरकरिता सर्वपक्षीय अभ्यासगटाची मागणी करा ज्यात आंदोलकांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल. हा गट तारापूर, कैगा, कल्पक्कम या किनारी अणुप्रकल्पांना भेटी देऊन तेथील परिणाम-दुष्परिणामांचा अभ्यास करेल. गट सर्वपक्षीय असल्याने पारदर्शकता येईल आणि राजकीय सोयीला थारा उरणार नाही.
तुमचा राजकीय स्वार्थाचा मुद्दा एकदम पटला. मला भीती वाटते की यांचा राजकीय स्वार्थ आपल्या देशाला पार रसातळाला नेईल. आमच्या पुढची पिढी स्वत:च्या भारतीय असण्याला दुर्दैव मानेल की काय असं वाटतं. यासाठी मला शिक्षणानंतर प्रत्यक्ष राजकारणात यायची इच्छा आहे. कारण we can change the system only by being the part of the system. पण मी कितपत यशस्वी होईन याबद्दल शंका आहे.
------------------------------------------------------------------------------
Aniruddha Phalnikar December 21 at 8:22pm Report
आणि भूगर्भातील इंधन साठ्यांबद्दलच बोलायचं झालं, तर त्याला अपारंपरिक उर्जास्रोतांचा पर्याय आहेच ना? जैतापूर, जिंदाल किंवा एन्रॉन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जेवढी राजकीय इच्छाशक्ती पणाला लावली जात आहे, तेवढी गुहागरच्या सागरी लाटांवरील उर्जानिर्मिती प्रकल्पासाठी किंवा देवगड-वाई-धुळ्यातील पवनउर्जा प्रकल्पांसाठी का लावली जात नाही? उर्जानिर्मिती आणि संवर्धनाबाबत नेत्यांची तोंडी मतं आणि प्रत्यक्ष धोरणं किंवा सवयी यात भयंकर तफावत आणि विरोधाभास आहे. या विषयावर सविस्तर बोलायचं झाल्यास वर्तमानपत्राचा अख्खा अंक लागेल!
--------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट