कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी प्रयत्न (विशाखा गाईड लाईन्स) कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक सतावणूकीस प्रतिबंध करण्यासाठी 1992 चा रिट विनंती अर्ज (सीआरएल) क्र.666-70/92 मध्ये दिनांक 13 ऑगस्ट, 1997 रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय “विशाखा जजमेंट” या नावाने सुपरिचित आहे. जोपर्यंत महिला कर्मचार्यांच्या लैंगिक शोषणाबाबत केंद्र शासन आवश्यक असा कायदा पारित करीत नाही तोपर्यंत ही मार्गदर्शक तत्वेच कायदा समजून मालकांवर आणि शासनांवर बंधनकारक राहतील, असेही न्यायनिर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र शासनाने अद्यापि लैंगिक शोषणासंदर्भातील विधेयक 2007 अंतिमरित्या पारित केलेले नाही. लैगिक छळवादामध्ये खालील बाबीचा समावेश होतो :- अ) शारिरीक संपर्क आणि कामोद्द्ीपिक प्रणयचेष्टा ब) लैगिक सौख्याची मागणी अथवा विनंती क) लैगिक वासनेने प्रेरित वाटतील शेरे ड) कोणत्याही स्वरुपातील संभोग वर्णन / संभोग दर्शन / अश्लील सहित्यांचे प्रदर्शन इ) कोणतेही अन्य अशोभनीय शारिरीक शारिरिक तोंडी अथवा सांकेतिक आचारण मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयातील मार्गदर्शक त...