मंदिरांचे ऐतिहासिक योगदान
सा. विवेक मधील माझा लेख दिनांक 22 Dec 2014
भारतीय संस्कृतीत देवाचे स्थान काय? हा प्रश्न विचारला तर मोठे चमत्कारिक उत्तर मिळते. देव असतो का? याला सांख्य तत्त्वज्ञानात 'नाही' असे उत्तर दिले गेले. मात्र देव नसून त्याऐवजी अपरिवर्तनशील असा पुरुष आणि परिवर्तनशील अशी प्रकृती असतात आणि त्यांचेच एकत्रित व्यवहार आपल्याला जगभर चालताना दिसतात असा सिध्दान्त मांडणारे सांख्य तत्त्वज्ञान मोठया प्रमाणात लिहिले गेले. सर्व प्रकारच्या दुःखांचे आणि तापाचे निराकरण हवे असेल तर नियमित अभ्यासाने पुरुष-प्रकृति भेदाचा अनुभव घ्यावा त्यातून कैवल्य मिळते.
या पुरुषामधील 'चैतन्य' किंवा ब्रह्म हे अभ्यास करण्यायोग्य एक वेगळे तत्त्व असून ते म्हणजेच ईश्वर, असा सिध्दान्त योगसूत्रांमध्ये मांडला गेला. थोडक्यात, कैवल्याची प्राप्ती होण्यासाठी ईश्वराची किंवा ईश्वरकृपेची गरज नसून पुरुष-प्रकृती भेद ओळखून त्याप्रमाणे वागता आले तरी पुरते, असा सांख्यांचा निरीश्वरवादाचा सिध्दान्त, तर ईश्वराची श्रध्दापूर्वक उपासना केल्याने कैवल्याचा मार्ग सुकर होतो हा योगसूत्रकारांचा ईश्वरवादी सिद्धांत. भगवद्गीतेत मात्र "एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति असे स्पष्ट केले आहे. चार्वाकाने देवाचे अस्तित्व नाकारले तसेच कराल तसे भराल हा कर्माचा सिध्दान्त बाजूला ठेवला आणि पुनर्जन्माचा देखील. त्याचे खूप अनुयायी झाले किंवा त्याचे त्यातले ज्ञान पार पसरले असे नाही. पण ईश्वराचे असणं-नसणे याबाबत आढावा घेताना त्याचेही मत नोंदले जाते.
एवंच, सुरुवातीला निरीश्वरवाद, ईश्वरवाद दोन्ही होते. पण ईश्वर असेल तर तो निर्गुण आणि निराकार आहे असे प्रतिपादन केले गेले. मात्र नारदाच्या रचनांपासून भक्तिमार्गाचा प्रारंभ झाला आणि सगुण साकार ईश्वराची कल्पना पुढे आली. चराचराला व्यापून असलेली प्रचंड ऊर्जा मानवाच्या ठिकाणीही वास करते, पण तिचा प्रत्यय घ्यायचा असेल तर भक्तिमार्ग हा जास्त सोपा आणि सामान्यजनांसाठी अधिक सुलभ असतो हा तो सिद्धांत.
आणि ईश्वर साकार व सगुणच आहे असं म्हटल्यावर त्याची विभिन्न रूपं असणार हे उघड आहे. 'जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी' हे संत वाक्य आहेच. गीतेच्या विभूतीयोगात भक्तजनांबद्दल म्हटले आहे - मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम् । कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च।।
अर्थात् ज्यांचे चित्त आणि प्राण माझ्यामध्येच रममाण झाले आहे, असे भक्तजन एकत्र येऊन एकमेकांना उपदेश देतात, माझ्या रूपाबद्दल चर्चा करतात आणि त्यातच त्यांना संतोष आणि आनंद मिळतो. हा झाला सत्संग-महिमा.
याच्या पुढची पायरी म्हणजे मंदिरे बांधली जाणे हे ओघाने आलेच. तिथे मूर्ती बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पध्दत आहे. त्याचे मंत्रही फार उद्बोधक आहेत. 'माझे प्राण मी तुझ्यात ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी ती प्रार्थना आहे.
अशा प्रकारे सगुण ईश्वरोपासना, मूर्ती आणि मंदिरे असा प्रवास झाला. त्यालाही हजारो वर्षे लोटली. हळूहळू मंदिरांना वैयक्तिक भक्तीच्या पलीकडे एक वेगळा सामाजिक आयाम मिळू लागला.

भक्तांचे सत्संगाचे ठिकाण हे स्वरूप तर कायम राहिलेच, त्याचबरोबर मंदिरे ही पांथस्थांसाठी विसाव्याचे ठिकाण, विद्याध्ययनाचे ठिकाण, देशदेशांच्या बातम्या समजण्याचे ठिकाण आणि मोठया अंशी धनसंचयाचेही ठिकाण बनले. देवाला श्रध्देने वाहिलेले फूल, फळ, पान सगळे चालते. असे असले तरी काहींना आपली कृतज्ञता जास्त योग्य तऱ्हेने प्रकट व्हावी असे वाटले की देवाला मोठमोठया रकमा अर्पण होऊ लागतात. मंदिरांचेही तसेच झाले. मग कुणी मंदिराचा जीर्णोध्दार, कुणी फरश्या, पायऱ्या, कुणी कळस, कुणी सोन्याचा पत्रा अशा प्रकारे धनसंचय होत गेला. जमिनीही देवाला अर्पण केल्या गेल्या.

या व्यवहारांमध्ये पुजाऱ्याचे ज्ञान आणि सचोटी गृहीत धरलेली होती. किंबहुना त्या प्रकारचे वैराग्य व विद्वत्ता असणारेच पुजारी असत. त्यामुळे देवावर वाहिलेले दागदागिने, धनसंपत्ती जमा राहत होती. तिची योग्य व्यवस्था व जपणूक तसेच योग्य वापर  केली जाईल असा विश्वास भक्तजनांना असायचा.. असे म्हणतात की, मुहम्मद गजनीने सतरा वेळा सोमनाथाचे मंदिर लुटले आणि प्रत्येक वेळा 40 उंटांवर लादून सोने घेऊन गेला. यावरून जागृत ठरलेल्या देवस्थानांवर किती धनसंपत्ती वाहिली जात असेल त्याचा अंदाज येतो. अगदी आजच्या काळातही पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सिध्दिविनायक, शिरडी साईबाबा ही श्रीमंत देवस्थाने म्हणून प्रसिध्द आहेत.

पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती. ती प्रथादेखील थोडयाफार प्रमाणात टिकून आहे. पण विद्यादानाचे केंद्र ही मंदिरांची ओळख मात्र पार संपलेली आहे. पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. अजूनही गुरुवायुर मंदिर, जालन्या शेजारील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदी अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे मी स्वत: पाहिले आहे. पण भारतातील कोटयवधी मंदिरांपैकी अशी शंभर तरी मंदिरे असतील का याबाबत मला शंका आहे. 

तोच मुद्दा विद्यादानाचा किंवा विद्याकेंद्रांचा. आता तिरुपती बालाजी, पुद्दुचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र) अशा काही संस्थांनी अगदी अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सिटीचा) दर्जादेखील घेतला आहे. परंतु गरजू, गरीब विद्यार्थ्यांना अखंडपणे व मोठया संख्येने विद्याध्ययनाची सोय तेही करत नाहीत. हरेकृष्ण मठ, रामकृष्ण मठ इत्यादीमध्ये ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ विक्रीची व्यवस्था आहे. पण विद्यादानाची नाही. चेन हॉटेल्स निघतात, त्या धर्तीवर स्वामीनारायण मंदिरे किंवा बिर्ला मंदिरे आहेत. पैकी स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात, पण एखाद्या शिक्षण सम्राटाने फायद्याचा धंदा म्हणून शिक्षण संस्था चालवाव्या त्या धर्तीवर. त्यामुळे मंदिर हे विद्याभ्यासाची केंद्रे उरली नाहीत आणि विद्यादानाची तर मुळीच नाहीत.

पद्मनाभ मंदिराची संपत्ती लोकांपुढे जाहीर करा असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. हा हिंदू धर्मावर घाला आहे असे पुष्कळांना वाटले, पण मंदिरांची 'विद्यादानाचे केंद्र' ही ओळख नसेल आणि फक्त 'धनसंचयाचे केंद्र' एवढीच ओळख राहणार असेल, तरीही हिंदू संस्कृतीला धोकाच आहे याकडे अजून कुणी गांभीर्याने पाहिलेले नाही.भक्तांचे सत्संगाचे ठिकाण हे स्वरूप तर कायम राहिलेच, त्याचबरोबर मंदिरे ही पांथस्थांसाठी विसाव्याचे ठिकाण, विद्याध्ययनाचे ठिकाण, देशदेशांच्या बातम्या समजण्याचे ठिकाण आणि मोठया अंशी धनसंचयाचेही ठिकाण बनले. देवाला श्रध्देने वाहिलेले फूल, फळ, पान सगळे चालते. असे असले तरी काहींना आपली कृतज्ञता जास्त योग्य तऱ्हेने प्रकट व्हावी असे वाटले की देवाला मोठमोठया रकमा अर्पण होऊ लागतात. मंदिरांचेही तसेच झाले. मग कुणी मंदिराचा जीर्णोध्दार, कुणी फरश्या, पायऱ्या, कुणी कळस, कुणी सोन्याचा पत्रा अशा प्रकारे धनसंचय होत गेला. जमिनीही देवाला अर्पण केल्या गेल्या.
या व्यवहारांमध्ये पुजाऱ्याचे ज्ञान आणि सचोटी गृहीत धरलेली होती. किंबहुना त्या प्रकारचे वैराग्य व विद्वत्ता असणारेच पुजारी असत. त्यामुळे देवावर वाहिलेले दागदागिने, धनसंपत्ती जमा राहत होती. तिची योग्य व्यवस्था व जपणूक तसेच योग्य वापर केली जाईल असा विश्वास भक्तजनांना असायचा.. असे म्हणतात की, मुहम्मद गजनीने सतरा वेळा सोमनाथाचे मंदिर लुटले आणि प्रत्येक वेळा 40 उंटांवर लादून सोने घेऊन गेला. यावरून जागृत ठरलेल्या देवस्थानांवर किती धनसंपत्ती वाहिली जात असेल त्याचा अंदाज येतो. अगदी आजच्या काळातही पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सिध्दिविनायक, शिरडी साईबाबा ही श्रीमंत देवस्थाने म्हणून प्रसिध्द आहेत.
पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती. ती प्रथादेखील थोडयाफार प्रमाणात टिकून आहे. पण विद्यादानाचे केंद्र ही मंदिरांची ओळख मात्र पार संपलेली आहे. पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. अजूनही गुरुवायुर मंदिर, जालन्या शेजारील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदी अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे मी स्वत: पाहिले आहे. पण भारतातील कोटयवधी मंदिरांपैकी अशी शंभर तरी मंदिरे असतील का याबाबत मला शंका आहे.
तोच मुद्दा विद्यादानाचा किंवा विद्याकेंद्रांचा. आता तिरुपती बालाजी, पुद्दुचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र) अशा काही संस्थांनी अगदी अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सिटीचा) दर्जादेखील घेतला आहे. परंतु गरजू, गरीब विद्यार्थ्यांना अखंडपणे व मोठया संख्येने विद्याध्ययनाची सोय तेही करत नाहीत. हरेकृष्ण मठ, रामकृष्ण मठ इत्यादीमध्ये ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ विक्रीची व्यवस्था आहे. पण विद्यादानाची नाही. चेन हॉटेल्स निघतात, त्या धर्तीवर स्वामीनारायण मंदिरे किंवा बिर्ला मंदिरे आहेत. पैकी स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात, पण एखाद्या शिक्षण सम्राटाने फायद्याचा धंदा म्हणून शिक्षण संस्था चालवाव्या त्या धर्तीवर. त्यामुळे मंदिर हे विद्याभ्यासाची केंद्रे उरली नाहीत आणि विद्यादानाची तर मुळीच नाहीत.
पद्मनाभ मंदिराची संपत्ती लोकांपुढे जाहीर करा असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. हा हिंदू धर्मावर घाला आहे असे पुष्कळांना वाटले, पण मंदिरांची 'विद्यादानाचे केंद्र' ही ओळख नसेल आणि फक्त 'धनसंचयाचे केंद्र' एवढीच ओळख राहणार असेल, तरीही हिंदू संस्कृतीला धोकाच आहे याकडे अजून कुणी गांभीर्याने पाहिलेले नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट