चरखा-टकळीचे तत्वज्ञान (हे ही पहावे चरख्याचे तत्वज्ञान प्रत्यक्षांत आणता येईल कांय -- लोकसत्ता बुधवार 8 जुलै 2009 पुन्हा चरखा http://sites.google.com/site/leenameh/punha-charkha.pdf) काही दिवसापूर्वीची गोष्ट, एका विशिष्ट ध्यासामुळे मी ठरवलं की, आपण चरख्यावर सूत कातायला शिकायचं. ती सुरूवात झाली आणि एक वेगळचं तत्वज्ञान मनाला जाणवू लागलं. आता लक्षात आलं की, शेले विणताना कबीराला दोहे सुचत आणि जात्यावर बसून बहिणाबाईना ओव्या सुचत ते कसे. तसं पाहिल तर, चरखा हे दिसायला किती सोपं काम, चरख्याला एक टकळी असते आणि एक फिरवायची तबकडी. तबकडी गोल फिरवली की, टकळीवर दोरा फिरतो. त्याने दो-याला पीळ पडतो व त्याला मजबुती येते. दो-याच्या टोकाला पेळूचा कापूस गुंतवला आणी थोडासा ताण देऊन ओढल की, सूत निघत रहातं, तबकडी फिरवून या सुतावर हल्कासा पीळ देऊन पक्का करायचा आणि टकळीवर गुंडाळून घ्यायचा की पुन्हा पेळूतून नवीन धागा ओढायला आपण तयार. पण प्रत्यक्ष चरखा चालवायला बसल्यावर जाणवलं की हे काम दिसत तितकं सोप नाही. कापसातून जो धागा कातला जातो त्याच्या टोकाला भरपूर तंतू असतात. पेळूवर त्यांना ठेऊन टकळीने अग...
Comments