GHADI PATRAK -- from settlement Commissioner-2


2 सापडली -- सप्टें 96 व जाने 97
“सन १९९६ मधील दक्षातारोध  प्रकरणा बाबतचा तपशील”

अ.क्र        तपशील            दि. १/१/९६       पैकी तपासलेली            एकूण दक्षता रोध        १/९/९६  शिल्लक    
                                      शिल्लक  प्रकरणे             प्रकरणे            निकाली   प्रकरणे           प्रकरणे             
                                                                      
               
 १      दक्षतारोध नियत                ११७
                       प्रकरणे

 २      फेर वेतन निश्र्चितिमुळे    १७७*
         फेर दक्षतारोध प्रकरणे







९८


४६
८६


४६
३१


१३१

एकूण
२९४
१४४
१३२
१६२

दक्षता रोध


टिप: *सदरची फेर वेतन निश्र्चिती प्रकरणे, वर्ग- २ व वर्ग ३ मिळून असून त्यात दक्षतारोध बाबत फेर निर्णय जमाबंदी आयुक्त , पुणे व उपसंचालक भूमिलेख यांचे स्तरावरून होणार आहे.
     जमाबंदी आयुक्त , पुणे कार्यालयातील दक्षतारोध प्रकरणांचा जलद गतीने व परिणामकारक निपटारा होणेसाठी व 
अचूक, निःपक्षपाती व नियमानुसार निर्णय होणेसाठी दक्षतारोध समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचे तिनही जमाबंदी उप आयुक्त सदस्य आहेत. सदर समितीची सभा दर तीन महिन्यातून एकदा घेण्यात येते व समितीचे सदस्य बैठकीच्या वेळी दक्षतारोध प्रकरणांचा आढावा घेतात. व प्रत्येक प्रकरण नियमांतर्गत तपासून, (एकमताने मान्यतेसाठी शिफारस, एकमताने नाकारण्यासाठी शिफारस किंवा एकमताने काठावरचे प्रकरण असा शेरा देतात) तद्नंतर जमाबंदी आयुक्त , पुणे प्रत्येक प्रकरण नियमांतर्गत तपासून व समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार करून प्रकरणी अंतिम निर्णय घेतात. या पध्दतीमुळे आठ महिन्यात १३२ दक्षतारोध प्रकरणी निर्णय घेता आला आहे. अद्यापही निर्णय होणेवर १६२ प्रकरणे आहेत. या शिवाय वर्ग- ३ मधील काही दक्षतारोध प्रकरणे उपसंचालक भूमि अभिलेख/ अधिक्षक भूमि अभिलेख यांचेकडे शिल्लक आहेत. या विभागाकडे शिल्लक असलेल्या सर्व दक्षतारोध 
प्रकरणांचानिपटारा पुढील तीन महिन्यात करण्याचा प्रयत्न आहे. तसेच वर्ग-३ व वर्ग-४ चे दक्षतारोधबाबततत्सम पध्दत उ.सं.भू.अ. व अ.भू. अ. यांनी वापरणेची आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“विलंब टाळा - कार्यक्षम व्हा”
प्रति,
----------------
----------------
----------------
-----------------

पीन

















सप्टेंबर १९९६
फोल्डर प्रकाशीत करण्याचा उद्देश

     जमीन बाबीची अद्ययावतव अचूक माहिती ठेवण्याचे महत्वपूर्ण काम भूमि अभिलेख विभागामार्फत केले जाते.ब्रिटिश अमदानीमध्ये शंखु व साखली यांचे सहाय्याने केले जाणारे मोजणी काम त्यानंतर प्लेन टेबलने केले जाऊ लागले. आता दुर्बिण मोजणी करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल दुर्बीण यंत्र आपल्याकडे आहे. राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यालयांमधे झेरॉक्स मशीन बसविल्या असून लवकरच त्यांचा उपयोग शासकीय कामाशिवाय अर्जदाराना नकला देणेसाठी करता येईल. भूमि अभिलेखांचे संगणकोकरण करण्याचे कामही वेगाने चालु असून त्याचा फायदा निश्चितच जनतेला त्यांची कामे लवकर होण्यासाठी होईल. एकंदर पाहता भूमि अभिलेख विभागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर चालु आहे. या वेगाने घडणा-या बदलांची व आधुनिक 
तंत्राची माहिती खात्यातील सर्वांना असणे अगत्याचे आहे. 
     जमाबंदी आयुक्त, पुणे कार्याल्यांतून आपले कार्याल्यांना सूचना, माहिती देण्यासाठी वेळोवेळी पारिपत्रके काढली जातात. यापुढे अशी परिपत्रके या फोल्डरच्या स्वरूपातून आपल्याकडे पोचविण्याचा मानस आहे. फोल्डर मध्ये दरमहा येणा-या माहितीमुळे आपल्याला प्रशिक्षण मिळून आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामाची कार्यक्षमता वाढावी हा महत्वाचा उद्देश या फोल्डर प्रकाशनाचे मागे आहे. त्यामुळे “विलंब टाळा कार्यक्षम व्हा” हे ब्रिदवाक्य म्हणून फोल्डरसाठी निवडण्यात आले आहे. या बोधवाक्यामुळे आपले स्वतःचे कार्यक्षमतेमध्ये  वाढ व्हावी या अपेक्षेसह हा प्रथम अंक प्रकाशित करण्यात येत आहे. आपापल्या कार्यालयांना विलंब टाळण्यासाठी व जनतेला सहकार्य देण्यासाठी आपण काय काय त्याची नोंद वरिष्ठांमार्फत आमच्याकडे पाठवावी.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमि अभिलेख (म.रा.) पुणे
बंगला क्र. ९, शास्त्रीनगर, येरवाडा, पुणे- ४११००६
फोन: ६८९५१३/४
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
महत्वाचे        क्रमांक: प्रशासन ३१२/ई-४/९६.
पुणे, दिनांक /९/१९९६

विषय:- नियंत्रण नोंदवही ठेवणे बाबत.....

परिपत्रक

      आमच्या असे निर्दशनास आले आहे की, सर्व कार्यालयीन प्रमुख, नियंत्रण अधिकारी , विभाग प्रमुख यांनी त्यांचे अधिनस्त कार्यालयांवर नियंत्रण ठेवणेसाठी कोणतीही प्रभावी पध्दत प्रचलित नाही. सर्व कार्यालयांमध्ये विविध बाबींसाठी वेगवेगळ्या नोंद वह्या ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर नोंदवह्यांची तपासणी दरमहा कार्यालय प्रमुख यांचेकडून केली जात नाही. तसेच नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांना त्यांचे अधिनस्थ अधिका-यांनी सदरची तपासणी केल्याचे समजण्यासाठी कोणतीही पध्दत सध्या प्रचलित नाही. त्यामुळे अधिनस्थ कार्यालयाकडून महत्वाच्या संदर्भामध्ये झालेल्या कार्यवाहीची माहिती नियंत्रण अधिकारी यांना तपासता येऊ शकत नाही.
 सर्व अधिका-यांची स्वतःच्या कामाची कार्यक्षमता वाढावी व त्यांचे अधिनस्थ कामावर सुय्योग्य नियंत्रण रहावे तसेच त्यांनी तपासणी केलेल्या बाबींची त्यांच्या वरिष्ठांना सुलभतेने दाखल घेता यावी, या दुहेरी उद्देशाने प्रत्येक अधिका-याने यापुढे त्यांची नियंत्रण नोंदवही ठेवावी. प्रत्येक अधिका-याचे काम थोडेफार वेगळे असल्याने प्रत्येकाची नियंत्रण नोंदवही थोडीफार वेगळी असेल. प्रत्येक अधिका-याने त्याच्या कामाच्या दृष्टीने इतर सहकारी व वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन आपआपल्या नियंत्रण नोंदवहीचानमुना ठरवावा. तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचे नियंत्रण नोंदवहीमध्ये त्यांचे कार्यालयातील इतर सर्व नोंदवह्यांची नोंद करावी. वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे नियंत्रण नोंदवहीमध्ये त्यांचे अधिनस्थ असलेल्या कार्यालय प्रमुख यांच्या नियंत्रण नोंदवह्यांची नोंद घ्यावी. नमुन्यासाठी जमाबंदी उपआयुक्त (स.सा) पुणे यांची नियंत्रण नोंदवही या सोबत दिली आहे. मात्र का. अ. इ. ४ यांचे नियंत्रण नोंदवहीमध्ये लोकआयुक्त संदर्भ, विधान सभा प्रश्न, शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांची नोंदवही इं. नांवे आहेत. यावरून ज.उ.आ. आणि क.अ. यांचे नियंत्रण नोंदवहीमधील वेगळेपणा समजून येईल.
     आपल्या कार्यालयातील सर्व नोंदवह्यांची दरमहा ज्या त्या अधिका-याने स्वतःच्या सोईने वेळच्या वेळी तपासणी करावी असे अपेक्षित आहे. सदरहू नोंदवह्या तपासताना साप्ताहिक गोषवारे काढले आहेत काय? शिल्लकी प्रकरणांचा तपशील कालावधी नुसार दिला आहे काय? शिल्लक संदर्भाचे अनुक्रमांक नमुद केलेआहेत काय? इत्यादि गोष्टींची खात्री करावी. अशा प्रकारे तपासलेल्या नोंदवहीबाबत नियंत्रण नोंदवहीतयोग्य तो शेरा ठेवावा. (नमुना पहावा) 
      उपरोक्त नियंत्रण नोंदवहीमुळे लोक आयुक्त संदर्भ, शासन संदर्भ, विधान सभा प्रश्न, विधान परिषद/विधान सभा सदस्यसंदर्भ इत्यादी महत्वाचे संदर्भ वेळेत निकाली केले जातात किंवा नाही याची माहिती होईल. तसेच शिल्लक प्रकरणांची दखल दर महिन्याला अधिकारी स्वतःघेतील यामुळे निपटारा करणेसाठी संबंधित अधिका-यांना निश्चित असा कार्यक्रम ठरविणे व त्यानुसार कार्यवाही करणे शक्य होईल. तसेच नियंत्रण नोंदवहीमुळे इतर सर्व नोंदवह्या अद्ययावत राहतील. वरिष्ठ कार्यालयांकडून उपरोक्त संदर्भाचे प्रगतीचा, प्रलंबिततेचा अहवाल वारंवार अधिनस्थ कार्यालयांकडून मागणी केला जातो, त्यावेळी संबंधित नोंदवह्या अद्ययावत राहिल्यामुळे माहिती काढणे सोपे होईल.
      कार्यालयातील ज्या-त्या नोंदवह्या अवलोकन केल्यावर संबंधित अधिका-याने नियंत्रण नोंदवही मध्ये. “पाहिले” , “सखोल तपासले” , “वर वर पाहिले” याप्रमाणे शेरे नमुद करुन दिनांकित स्वाक्षरी करावी. नियंत्रण नोंदवही वरिष्ठ अधिका-यांच्या अवलोकनासाठी वेळच्या वेळी सादर करावी.
      या नियंत्रण नोंदवहीमुळे ज्या त्या अधिका-याला स्वतःच्या कामाचा उठाव करता यावा ही अपेक्षा आहे, त्या प्रमाणे उठाव होऊ शकला की नाही याचा आढावा सर्व वरिष्ठ अधिका-यांनी दर महिन्याच्या मिटिंगला घेतला जाईल

-------------------------------------------------------------------------------------------------------------------










Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट