स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण'--तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर

स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण' --तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर
आदित्य व लीना मेहेंदळे
Friday, April 15, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: tanishka, careerist mother, aditya mehendale , leena mehendale




"या मुलाखतीच्या निमित्ताने मागे वळून पाहताना असं वाटतंय, की आईचं व्यक्तिमत्त्व, तिची महत्त्वाकांक्षी वृत्ती, तिचं प्रत्येक भूमिकेत झोकून देणं आम्ही अनुभवलं. ती आमच् यासाठी फक्त आई राहिली नाही, जितंजागतं रोल मॉडेल झाली. म्हणूनच आमच्यातही महत्त्वाकांक्षा रुजली, योग्य तो निर्णय घेण्याची वृत्ती आमच्यातही निर्माण झाली. आईपण हे " टिपिकल काळजीवाहू' आईच्या पलीकडे असतं. किमान आमच्या आईने तरी तसं मानलं आणि निभावलंही!'' सांगतोय आयएएस अधिकारी लीना मेहेंदळे यांचा इंजिनियर मुलगा आदित्य.
-------------------------------------------------------------
आपली आई इतर आयांपेक्षा वेगळी आहे याची जाण आम्हाला खूप उशिरा आली. त्याचं सगळं श्रेय आईलाच. ती नोकरी करते म्हणजे काही वेगळं आहे आणि त्यामुळे आमच्या रोजच्या आयुष्यात किंवा आमच्या नात्यात काही फरक पडू शकतो, असं तिने आम्हाला कधी जाणवूच दिलं नाही. ती आमची आई असणं, तिने आमची काळजी घेणं हे जितकं सहज होतं तितकंच तिचं करियर करणंही. आमच्या घरात त्याचा बाऊ कधीच झाला नाही. त्यामुळे आईच्या नोकरीमुळे आमच्यावर अन्याय झाला असं कधी वाटणं केवळ अशक्य.
आई जवळची मैत्रीण

उलट, आता या मुलाखतीच्या निमित्ताने मागे वळून पाहताना असं वाटतंय, की आईचं व्यक्तिमत्त्व, तिची महत्त्वाकांक्षी वृत्ती, तिचं प्रत्येक भूमिकेत झोकून देणं आम्ही अनुभवलं. ती आमच्यासाठी फक्त आई राहिली नाही, जितंजागतं रोल मॉडेल झाली. म्हणूनच आमच्यातही महत्त्वाकांक्षा रुजली. विचार करण्याची, त्यातून चांगलं-वाईट ठरवण्याची आणि योग्य तो निर्णय घेण्याची वृत्ती आमच्यातही निर्माण झाली, असं मला मनापासून वाटतं. ती केवळ गृहिणी असती तर हे झालं असतं का, याबद्दल आता शंका वाटते. तिचं स्वतःचं असं स्वतंत्र जग आहे, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, म्हणूनच ती आम्हाला आईबरोबरच इतरही अनेक नात्यांमधून भेटत राहिली. ती आमची जवळची मैत्रीण आहे, शिक्षक आहे, गाइड आहे. आईने दिलेला सल्ला बऱ्याचदा मुलांना पटत नाही. आम्ही लहान होतो तेव्हाही हे मी पाहिलंय, आताही पाहतोय. आईला काय कळतंय, असा मुलांचा त्यांच्या गृहिणी असणाऱ्या आयांबद्दल गैरसमज असतो. पण आमच्या बाबतीत मात्र तसं कधीच नव्हतं. आई आम्हाला अभ्यासात नेहमीच मदत करायची. शिक्षकांना अडणाऱ्या गोष्टीही ती सोडवू शकायची. कोणतीही गोष्ट मला जमणार नाही, असं म्हणण्याऐवजी "करून पाहायला काय हरकत आहे?' असा कायमच तिचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो.
टिपिकल काळजीवाहू नको
अर्थात आई म्हणूनही ती बेस्ट होती, आहे. आयएएस म्हणून अतिशय हेक्टिूक आणि तणावपूर्ण करियर करत असतानाही तिने कधी आमच्याकडे दुर्लक्ष केलंय असं मला आठवत नाही. कॉलेजमध्ये असताना एकदा अपघातात माझा पाय फ्रॅक्चकर झाला. आईचं पोस्टिंग तेव्हा दिल्लीत होतं. तसा मी काही लहान नव्हतो; पण आई सरळ पाच दिवस सुटी काढून हॉ स्पिटलमध्ये आली आणि मला सोबत घेऊनच घरी गेली. आम्हाला तिची गरज आहे आणि ती जवळ नाहीये, असं कधीच झालं नाही. खरं तर तिने आम्हाला असं वाढवलं की दरवेळी ती "फिजिकली" जवळ असण्याची गरजच नसायची. एकूणच, आईची जबाबदारी म्हणजे फक्त मुलांच्या खाण्या-पिण्याची, तब्येतीची काळजी, असं सरधोपटपणे मानलं जातं, आणि मग त्याच तकलादू निकषांवर नोकरी करणाऱ्या आयांचं आईपण जोखलं जातं. पण खरं तर आईपण अशा "टिपिकल काळजीवाहू" आईच्या पलीकडे असतं असं मला वाटतं. मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडावं, आपली मुलं विचार करणारी, शाळा-कॉलेजातल्या अभ्यासापलीकडे जाऊन विषयात रस घेणारी असावीत, दुसऱ्याला समजून घेणारी, दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणारी असावीत, यासाठीही प्रयत्न करणं हे खरं आईपण आहे. आमच्या आईने इतर काळज्यांना अवास्तव महत्त्व देण्यापेक्षा आम्हाला असं घडवण्यावर जास्त भर दिला असं मला वाटतं. आमचं पोट भरलं आहे की नाही याची काळजी तिला असायचीच, पण त्यापेक्षा जास्त रस तिला आमचं सध्या नवीन काय चालू आहे हे समजून घेण्यात असायचा.


उपद्‌व्यापांनाही कायम प्रोत्साहन
आम्ही शाळेत असल्यापासून आई आमची चांगली मैत्रीण होती. त्यामुळे ती घरी नसली किंवा आमच्या एखाद्या कार्यक्रमाला आली नाही तरी ते वाईट वाटणं तेवढ्यापुरतं असायचं. तिच्या बीझी शेड्युलमधूनही आमच्या तिच्याशी गप्पा होत असायच्या. शाळेतच नव्हे, तर आमच्या मनात सध्या काय चाललंय याचीही तिला नीट माहिती असायची. आमच्या दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं होतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती आमच्याबरोबर खेळायची, आमच्या अभ्यासात मदत करायची, आणि तो वेळ क्वालिटेटिव्हली घालवण्यावर तिचा भर असायचा. एखादा विज्ञानातला प्रयोग असो किंवा गाडी शिकणं, एखाद्या मित्रापेक्षा जास्त उत्साहात ती आमच्या पुढे असायची.

मला आठवतंय, झाडावर चढून बघणं हा इतर मुलांसारखाच आमचाही आवडता उद्योग असायचा. माझ्या मित्रांच्या आया त्यांना भीती घालायच्या. पडशील, हाड मोडेल, मला निस् तरावं लागेल, असं बरंच काही पोरांना ऐकावं लागायचं. सगळ्या आनंदावर पाणी पडायचं. पण आमची आई "नाही' म्हणणं तर सोडाच, उलट अशा उपद्‌व्यापांना कायम प्रोत्साहन द्य ायची. आम्ही झाडावर चढलो, की "तो पेरू काढून दे. अरे, घाबरतोस काय? जा अजून वर' असं म्हणत ती खाली उभी असायची. आमच्या मित्रांना आमचा जाम हेवा वाटायचा. हे करू नको, ते करू नको, असं तर तिने आम्हाला कधीच सांगितलं नाही. आहे हे असं आहे आणि असं केलं तर असं होऊ शकतं, एवढंच ती आम्हाला सांगायची. आई म्हणून मला तिचं हे वैशिष्ट्य सगळ्यात जास्त भावतं. आयुष्याकडे पाहण्याचा, त्याला सामोरं जाण्याचा ऍटिट्यूड तिने आमच्यात नकळत वाढवला. त्यामुळे कोणत्याही भावनिक चढ-उतारांना सामोरं जाताना प्रत्यक्ष तिची मदत घेतली नाही तरी ती ताकद तिच्यामुळेच मिळालेली असणार. आज नेदरलॅंड्‌सच्या प्रख्यात "डेमकॉन" या कंपनीत मेकॅट्रॉनिक्सा सिस्टीम्स इंजिनियर या वेगळ्या क्षेत्रात मी काम करतो आहे. करियरच्या या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर दरवेळी प्रत्यक्ष न भेटताही ती माझ्यामागे ठाम उभी आहे.

चौकटीबाहेरचं व्यक्तिमत्त्व
करियर आणि घर अशी तारेवरची कसरत करताना तिने हौस-मौज सोडली आहे असंही मला वाटत नाही. घर असो, काम असो किंवा ट्रिप असो, त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा तिचा स्वभाव आहे. आम्ही लहान असतानाही वर्षातून एकदा लांबचा दौरा काढायचोच. जवळपास सगळा भारत आम्ही एकत्र फिरलो. तो काळ धमाल मजा करायचो आम्ही. पण एकदा " मास्टर्स इन इकॉनॉमिक्सर" करण्यासाठी तिला इंग्लंडमध्ये वर्षभर राहायचं होतं. अशा वेळी एक तर एखाद्या आईला मुलांमुळे हा निर्णय घेताच आला नसता, किंवा मग अभ्यासात मुला ंची कटकट नको, असा विचार करून एखादीनं एकटीनेच जाण्याचा निर्णय घेतला असता. पण आमची आई चक्क आम्हाला दोघांना घेऊन तिकडे गेली. आमचं शाळेचं एक वर्ष बुडालं; पण त्या काळात आम्ही जे अनुभव घेतले ते अन्यथा आम्हाला कधीच मिळाले नसते. आणि आई तर तिच्या अभ्यासातही आम्हाला सहभागी करून घ्यायची. आम्ही तिचा अभ्यास घ्यायचो म्हणा ना! तिच्या एन्जॉयमेंटच्या कल्पनाच वेगळ्या होत्या. कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता सहजतेने जगत असल्यानेच तडजोडी कराव्या लागल्याची रुखरुख तिच्यात नसावी असं वाटतं. त्यामुळेच माझ्या आईचं आईपणाच्या चौकटी ओलांडणारं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच माझ्या दृष्टीने तिचं वेगळेपण, तिचं आईपण आहे. --- -आदित्य मेहेंदळे
----------------------------------------
आईच्या करियरमुळे 'एक्स्पो जर'
आईने नोकरी केली नसती तर ती आम्हाला लहानपणी अधिक वेळ देऊ शकली असती; पण त्याने फरक पडला असता असं काही वाटत नाही. उलट, तिच्या नोकरीमुळे आम्हाला खूप एक्स्पोकजर मिळालं, नव्या गोष्टी शिकता आल्या, जे अन्यथा शक्यचच झालं नसतं. नोकरी करत असतानाही आमच्यासाठी तिच्याकडे वेळ असायचा. आमच्या दैनंदिन गरजां पलीकडे जाण्यावर तिचा भर असायचा, आणि आमच्यात स्वतंत्र बुद्धी विकसित व्हावी यासाठी तिने कायम प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या नोकरीमुळे आमच्यावर अन्याय झाला असं आम्हाला बिलकूल वाटत नाही.
उलट, तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वामुळेच आम्ही आज जसे घडलो आहोत तसे आहोत असं वाटतं.
- हृषीकेश मेहेंदळे
------------------------------------------------------

बाहेरच्या विश्वातची जाण 'पास-ऑन' करू शकले
नोकरी करत नसते तर मुलांसोबत कदाचित जास्त वेळ घालवता आला असता. पण त्यामुळे आमच्या नात्यात आणि व्यक्तिमत्त्वातही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट किती झाली असती? अर्थ शास्त्रात "थिअरी ऑफ डिमिनिशिंग इफेक्‌्व स" आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर एका विशिष्ट काळापर्यंत रिटर्न्स वाढत जातात. मात्र एक वेळ अशी येते, की तुम्ही कितीही गुंतवणूक केलीत तरी रिटर्न्सचं प्रमाण कमीच होत जातं. माझ्या मते मुलांना एका मर्यादेनंतर वेळ देतच राहिलं तर त्यामुळे त्यांच्यावरही बंधनं येतात आणि तुमच्या क्षितिजालाही मर्यादा पडतात. त्यामुळे किती वेळ दिला यापेक्षा आहे तो वेळ आपण कसा वापरतो हे जास्त महत्त्वाचं आहे.
शिवाय मी नोकरी करत असल्याने मला बाहेरच्या विश्वातची जाण येत होती, ती मी माझ्या मुलांपर्यंत "पास-ऑन' करू शकत होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच व्हॅल्यू ऍ डिशन झाली, जी अन्यथा मी केवळ गृहिणी असते तर कदाचित शक्यण झाली नसती.
मुलांना वाढवताना गरज पडेल तेव्हा आई, सासू, नणंद, बहीण अशांची मी मदत घेतली. आणि नणंद, बहीण यांच्या मुलांसाठीही माझं घर हक्काचं होतं. त्यामुळे ती सोय तडजोड न बनता मुलांसाठी नवं क्षितिज विस्तारणारी, नव्या नात्यांना जन्म देणारी ठरली.
(शब्दांकन- गौरी कानेटकर)

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट