शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरीता दूरदर्शन मालिका
!! विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरीता दूरदर्शन मालिकेद्बारे प्रबोधन करणे - मालिकेची थीम !!
---------------------------------------------------------------------
पार्श्र्वभूमी :
गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे दिसून येते. सदरच्या आत्महत्या शेतकऱ्यांमध्ये आलेल्या नैराश्येपोटी होत असल्याचे असून त्यामागे नापिक जमिनी, अवेळी पाऊस, अल्प उत्पन्न तसेच यामुळे वाढलेला कर्जबाजारीपणा इत्यादी कारणे असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांची नैराश्यची भावना दूर करण्याच्या उद्देशाने व पूरक जोडधंदा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने विशेष पॅकेज उपलब्ध करुन दिले आहेत. सदर पॅकेज अंतर्गत विविध योजनांचा अंतर्भाव असून शेतक-यांना प्रशिक्षण देणे व त्यातून त्यांची मानसिक स्थितीत सुधारणा घडवून पॅकेज अंतर्गत उपलब्ध असलेल्या योजनांचा फायदा घेणे हा प्रमुख उद्देश सदर प्रशिक्षणांतर्गत आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विदर्भाबाहेर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात सहलीद्बारे नेऊन त्याठिकाणी पशुपालनामध्ये व दुग्ध उत्पादनामध्ये झालेली वाढ व त्याकरीता शेतकरी करीत असलेले आधुनिक उपाययोजना याबाबतची माहिती व प्रात्यक्षिकाद्बारे दाखविणे हा प्रमुख उद्देश आहे.
दूरदर्शन मालिकेसाठी थीम (Concept)
मालिकेचा नायक व नायिका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. एकदा प्रशिक्षणाकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याकरीता प्रसिध्दी माध्यमातून जाहिरात दिली जाते. सदर जाहिरातीमध्ये शेतकऱ्यांना आकृष्ट करण्याकरीता महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान उदा. तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या देवतांचे दर्शन घडवून पशुधन जोपासणेबाबत आधुनिक पध्दतींची माहिती देणेबाबत प्रसिध्दी दिलेली असते. सदर जाहिरात खेडोपाडयात सुध्दा पोहचविण्यात येते. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनासुध्दा या जाहिरातीबाबत माहिती देण्यात येते. जाहिरातीमधील माहिती प्राथमिक शाळेतील धाकटी बहीण आपल्या पालकांना देते. सदरचे कुटुंब कर्जबाजारी असून पती पत्नी व मोठा मुलगा रोजंदारीवरील कामकाज करुन कुटुंबाचा चरितार्थ भागवित असतात. या कुटुंबाकडे दोन ते अडीच एकेर कोरडवाहू शेती असून नैसर्गिक पावसावर अत्यंत अल्प उत्पन्न मिळत असते. तसेच घरातील मोठ्या मुलीचे लग्न गेल्यावर्षी करण्याकरीता स्थानिक सावकराकडून कर्ज घेतलेले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील छोटी मुलगी शाळेमध्ये मिळालेली जाहिरात आई वडिलांच्या हातात देऊन यातील योजनामुळे कुटुंबाचा फायदा होईल असे गुरुजींनी सांगितल्याचे सांगते. रात्री झोपण्यापूर्वी कुटुंबातील स्त्री पतिस सांगते की, आपण सदर सहलीस जाऊया त्यामुळे काही आर्थिक फायदा झाला नाही तरी देव दर्शन तरी होईल. जन्माला येऊन आतापर्यत दारीद्रयातच खितपत पडलो. कुठल्याही देवाचे दर्शन घेता आलेले नाही. निदान या सहलीच्या निमित्ताने मरण्यापूर्वी देवाचे दर्शन तरी होईल अशा प्रकारची गळ आपल्या पतीला घालते. बराच काळ चर्चा केल्यावर पती पत्नीचा एक विचार होऊन सहलीस जाण्याचे ठरते. दुसरे दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सदर सहलीस जाण्यासाठी कोणाकडे व कसा अर्ज करावयाचा याबाबत कुटुंब प्रमुख ग्रामसेवक व सरपंच यांचेकडे विचारणा करतो. त्याच दिवशी दुपारी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे पंचायत स्तरावरील अधिकारी लाभार्थी निवड करण्याकरीता येणार होते. गावामध्ये सदरची माहिती दवंडीद्बारे व नोटीस बोर्डावर लावण्यात आली होती. सदरची नोटीस ग्रामसेवकांनी त्यांना दाखवली व दुपारी पंचायतीमध्ये येण्यास सांगितले.
ग्रामपंचायतीमध्ये भरुन दिलेल्या अर्जाप्रमाणे सदर कुटुंबातील पती पत्नीची निवड सहलीकरीता केली जाते व त्याप्रमाणे सहलीचा कार्यक्रम कळविण्यात येतो.
शैक्षणिक सहलीमध्ये 30 - 40 लोकांचा सहभाग असून सहलीच्या सुरवातीस त्यांना तुळजापूर येथील भवानी मातेचे दर्शन घडवून पंढरपूर येथे श्री पांडूरंगाचे दर्शनास नेण्यात येईल असे सांगण्यात आले. तुळजापुर येथे मुक्कामात सहलीमधील लाभार्थी चर्चा करताना बर झाल सहलीस आलो. त्या निमित्ताने पांडूरंगाचे दर्शन तरी होईल. अशाप्रकारे चर्चा करतात. दुसऱ्या दिवशी मिरजमार्गे कोल्हापूरकडे जाताना दुग्ध प्रकल्पास व पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयास भेट आयोजित करुन दुग्धावर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया, साठवणूक इत्यादीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाते. तसेच पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे जास्त दुध देणाऱ्यां गायी, म्हशी त्यांची निगाह, आहार, रोगराईपासून संरक्षण तसेच स्वच्छ दुध निर्मितीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येते. त्यानंतर वारणा दुध प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची माहिती दिली जाते. गोकुळ, वारणा प्रकल्पांतर्गत वाटप केलेल्या दुभत्या गायी, म्हशींच्या काही शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन खेडे गावातील जनावरांचे गोठे, जनावरांची जोपासणा, आहार, रोगराईपासून संरक्षण, स्वच्छ दुध निर्मिती इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाते.
तीन ते चार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ व सहलीस आलेले लाभार्थी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली जाते. सदर चर्चेमध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन इत्यादीबाबत तांत्रिक अधिकारी समक्ष भाग घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करतात. तसेच वारणा, गोकुळ प्रकल्पातील शेतकरी आपण पशुधनाचे व्यवसायापासून कशी समृध्दी साधली याबाबतची यशोगाथाही सांगतात. पंढरपूर येथे पांडुरंगाचे व कोल्हापूर येथील आंबाबाई मातेचे दर्शन घेऊन लाभार्थिना परत त्यांचे गावी आणण्यात येते. परतीच्या प्रवासात सर्व शेतकरी कुटुंबामध्ये आपण घेतलेल्या देवदर्शनापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतीला पूरक धंदा म्हणून मूळ धरलेल्या व वाढलेल्या पशुसंवर्धन कामाची चर्चा होत राहते व गावी परतल्यावर कोणी गायी सांभाळण्याच्या, कोणी शेळया, कोणी म्हशी सांभाळण्याचा उद्योग करुन कुटुंबास आर्थिक हातभार लावणेबाबत चर्चा करतात. गायी परतल्यावर ग्रामपंचायतीकडे सर्व लाभार्थी मिळून अर्ज करतात की, पशुसंवर्धनाच्या योजना आम्हाला घ्यावयाच्या असून त्याबाबत नियोजन सुरु होते. अशा उत्साहाच्या धर्तीवर ही मालिका संपते.
-----------------------------------------------------------------------------------------

प्रति,
श्रीमती
श्रद्धा बेलसरे,
संचालक,
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय,
मुंबई
विषय
:
महाराष्ट्र
पशुधन विकास मंडळ अकोला
यांचेद्वारे दूरदर्शनवरून
पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय
विकास आणि मतस्यव्यवसाय विषयक
मालिका प्रसारित करणे मालिकेच्या
निर्मात्यास अदा करण्याच्या
मोबदल्याचे अनुज्ञेय अनुदानाबाबत.
क्र.
एसव्हएस
१००७/ग्रक
136/- / पदुम
४ मुंबई ३२ दिनांक ११/०५/२००७
महाराष्ट्र
पशुधन विकास मंडळ अकोला द्वारे
राज्यातील सर्व शेतकरी पशुपालक
व विशेषतः विदर्भातील शेतक-यांच्या
आत्महत्यांनी ग्रस्त झालेल्या
जिल्ह्यातील शेतकरी,
पशुपालक यांचेशी
सुसंवात साधण्यासाठी व्यावसायीक
निर्मात्याकडून चित्रिकरण
करून घेऊन व्हीडीओ फिल्मसची
एक मालिका दूरदर्शवरून प्रसारित
करण्याचे ठरविण्यांत आलेले
आहे. याकरिता
प्राथमिक कार्यवाही सुरु
करण्यांत आली आहे त्याचाच
भाग म्हणून दि.
२७/१२/२००६
रोजी मा.
प्रधान सचिव (पदुम)
यांच्या दालनात
झालेल्या बैठकीमध्ये काही
निर्मात्यांनी सादरीकरण
केले. प्रस्तूत
बैठकीस आपणासोबत श्री इगवे
वरिष्ठ सहायक हे देखील उपस्थित होते.
आपणांस
विनंती करण्यांत येत की.
नियोजित
दूरदर्शन मालिकेच्या निर्मात्याना
अनुज्ञेय असलेला मोबदला निश्चित
करण्यासाठी काय निकष आहेत
याची लेखी माहिती कृपया हे
पत्र घेऊन येणाऱ्यां डॉ. आर.
एल.
पालिमकर,
विशेष
कार्य अधिकारी, यांचेसोबत
देण्यांत यांवी. त्याच
प्रमाणे कृपया या अनुषंगाने
डीएव्हीपी यांनी मान्य
केल्यानुसार दर काय आहे ही
माहिती देखील कृपया कळविण्यात
यांवी.
(डॉ.
प्र.
ल.
काकडे)
अवर
सचिव.
महाराष्ट्र शासन
कृषि,
पशुसंवर्धन,
दुग्ध व्यवसाय विकास
व
मत्स्यव्यवसाय
विभाग,
मंत्रालय,
मुंबई-३२
Comments
बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची
उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे
आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी
मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्त्येची
कारणमीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद
करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया
शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही.
ज्यांना शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे
असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ञानी आयुष्यात
एकदा तरी सलगपणे काही दिवस शेतकरी
समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात कि वा
राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला
हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात आणि
तो किती कष्ट करतो हे समजणे शक्यच नाही.
४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या
झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी
समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,
पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,
अलायक तज्ञांच्या हातात सोपवला असा प्रश्न जर
कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद
घालता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक
निराकरण करता येईल.?
अपूर्ण ...
गंगाधर मुटे
For More Pls Visit .
http://vidarbhashetkarisabha.blogspot.com/