शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या-
संदर्भांतील मार्गदर्शक तत्वे.


महाराष्ट्र शासन
कृषि,पशुसंवर्धन, दुग्ध व्यसाय विकास व मत्स्यवसाय विभाग
शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण.१००६/६२४५/प्र.क्र.५९/पदुम-१७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२.
दिनांक- ३१ ऑक्टोबर, २००६


वाचा- महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ या विषयाबाबतची सामान्य प्रशासन विभागाची दि.२५ मे,२००६ ची अधिसूचना.

परिपत्रक

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्यासंदर्भांतील शासनाने महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ दिनांक १ जुलै २००६ पासून अंमलात आणला आहे.

अधिनियमाच्या कलम-३(१) नुसार अधिकारी/कर्मचा-यांच्या नेमणुकीचा कालावधी ३ वर्षाचा आहे. कलम-४(१) नुसार बदलीच्या पदावरील म्हणजे ३ वर्षाचा कालावधी पूर्ण केला असल्याखेरीज सामान्यपणे त्यांची बदली करता येणार नाही.

२. हा अधिनियम शासकीय अधिकारी/कमर्चा-यास जशास तसा लागू राहील. या अधिनियमास कोणतीही बाधा न आणता खालील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी शक्य तितक्या प्रमाणात पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागातंर्गत कार्यरत असलेल्या कमर्चा-यांसाठी करण्यांत येईल.

अ) किती बदल्या ?
ज्या कर्मचा-यांच्या सेवा त्या पदावर ३ वर्षे झाली आहे, त्यांनाच बदलीपात्र समजण्यात येईल.

बदलीपात्र कर्मचा-यांची कार्यरत पदावरील सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन विभाग निहाय/राज्यस्तरीय यादी करण्यांत यावी. त्यापैकी एकूण पात्र पैकी ३०%कर्मचा-यांचीच बदली करण्यांत यावी.

आ) बदलीची पध्दत
क) सेवानिवृत्तीस २ वर्षे बाकी असतांना कर्मचा-यांच्या विनंतीनुसार बदली करण्यांत यावी. शक्यतो मागितलेल्या ठिकाणचे मुख्यालय किंवा जवळपासच्या भागात बदली करण्यांत यावी. विनंती नसल्यास बदली करु नये.

ख) पती-पत्नी एकत्रिकरणानुसार बदली करावी.

ग) मतीमंद मुलांच्या म्हणजे अंध,अपंग व मुक-बधीर पाल्यांच्या पालकांची बदली त्यांच्या विनंतीप्रमाणे करावी.

घ) प्रत्येक कर्माचा-यांची दहा-दहा वर्षात नक्षलग्रस्त आदिवासी भागात बदली करावी. वर्ग-२,३,४ मधील महिलांची शक्यतो नक्षलग्रस्त भागात बदली करु नये.

ड) आदिवासी/नक्षलग्रस्त भागात २ वर्षे काम केलेल्या कर्मचा-याची त्याच्या पसंतीच्या ठिकाणी बदली करावी.

च) सर्व कर्मचा-यांना एकूण ३० वर्षाच्या सेवेत शक्यतो २ वेळा पसंतीच्या पदावर बदली करावी. साधारणत: पहिल्या २५ वर्षात एकदा व दुस-या २५ वर्षात, याप्रमाणे बदली करावी.

छ) वर्ग-३ च्या कर्मचा-यांकरिता ६ वर्षापर्यंत मुख्यालयाबाहेर बदली करण्यांत येऊ नये. ६ वर्षानंतर मुख्यालयात बदली करावी, परंतु जिल्हा बदलू नये.

ज) वर्ग-३ च्या कर्मचा-याकरिता १० वर्षानंतर त्यांची बदली जिल्हाबाहेर करण्यांत यावी. परंतु महिला कर्मचा-यांच्या बदल्या जिल्हाबाहेर करण्याची गरज नाही.

झ) वर्ग-४ च्या कर्मचा-याबाबत शक्यतो त्यांची जिल्हयाबाहेर बदली करु नये, परंतु विनंती केली असल्यास विचार करावा.

३. वरील मार्गदर्शक तत्वांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी-
अ) विनंती असल्यास बदलीचा विचार करावा.

ब) कर्मचा-याविरुध्द विभागीय चैकशी (विभागीय चौकशी नियम-८ खालील) चालू असेल तर प्रशासकीय निर्णय घेऊन बदली करावी.

क) काही कर्मचा-यांची प्रशासकीय सोयासाठी बदली करणे अपरिहार्य असेल तर अशा कर्मचा-यांची बदली करण्यांत यावी.

४. वरील बदल्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमात कोणतीही बाधा न आणता शक्य तितक्या प्रमाणात अंमलात आणण्यात यावी.

५. राजकीय दबाब आणणारे अधिकारी/कर्मचारी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक क्र.सीडीआर.१००६/प्र.क्र.१२/०६/अकरा, मंत्रालय, मुंबई दि.१७.०८.२००६ नुसार कारवाईस पात्र असतील.

६. हे आदेश कृषी व पदुम विभागाअंतर्गत आयुक्त,पशुसंवर्धन, आयुक्त,दुग्धव्यवसाय व आयुक्त,मत्स्यव्यवसाय यांच्या अखत्यारितील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यास लागू करण्यांत येत आहेत. याची अंमलबजावणी आयुक्त,पशुसंवर्धन, आयुक्त,दुग्धव्यवसाय व आयुक्त,मत्स्यव्यवसाय यांनी करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



सही/-
( सु.ना.पवार )
कार्यासन अधिकारी,महाराष्ट्र शासन,
कृषि,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

प्रति,-
आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे
सह आयुक्त, पशुसंवर्धन(मुख्यालय), महाराज्य, पुणे
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई
उप आयुक्त(प्रशासन), दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई
आयुक्त, मत्स्यव्यसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

Comments

LALIT said…
माहिती पूर्ण ब्लोग आहे ..
धन्यवाद !!!!!!!!!!!!
LALIT said…
शासकीय कर्मचार्यांसाठी कृपया महत्वपूर्ण माहिती टाकत जावी हि अपेक्षा.
प्रतीक्षेत ...........
Yeshodhan said…
जर कर्मचारीचा सात ते आठ महीने पगार दिलाच नसेल तर त्याची बदली करता येते का?
Unknown said…
प्रशासकिय बदलिस कार्यालय रद्द करण्याची विनंति करने योग्य आहे का

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९