आपले भाषा वैविध्य
आपले भाषा वैविध्य रामराम मंडळी , आपल्या देशाची लोकसंख्या आहे सुमारे दीड शे कोटी . इथल्या प्रमुख भाषा मोजायच्या तर पन्नास एक भाषा निश्चितच अशा आहेत जी बोलणारे कोटयावधी , निदान एक कोटीपेक्षा जास्त लोक असतील . जगांत कांही छोटे - छोटे देश आहेत ज्यांची स्वतःची भाषा त्या देशांत बोलली जाते , व ती भाषा बोलणारे फक्त कांही लाख , कधी कधी तर फक्त कांही हजारच आहेत . पण ते सर्व देश प्रयत्नपूर्वक आपापल्या भाषा जपतात , आप ली भाषा भिन्नता जपतात . कोणी म्हणेल आपल्या देशात इतक्या भाषा असण्याचा काही फायदा आहे काय ? तर एक गोष्ट आठवते . 1971 मधे पाकिस्तानविरुद्ध बांगला देशाची स्वातंत्र्य लढाई चालू होती . त्यांच्या मदतीला भारतीय विमाने , व सेना तिकडे झेपावत होती . हे भारत - पाक युद्धच होते . अचानक आपल्या सैन्याला दाट संशय वाटू लागला की आपण जे संदेश प्रसारित करत आहोत त्यांचे डी कोडिंग पाकिस्तान सेनेला कळलेले आहेत त्यामुऴे आपला सर्व प्लान त्यांना समज त आहे . आता कांय करायचे ? नवीन कोड तयार करून रुजू करण्याइतका वेळ नव्हता . तेंव्हा कुणी त री शक्कल लढवली . आपल्या सैन्यात मल्याळी...