परीक्षा झाली तणावाची घोडा अडला
परीक्षा झाली तणावाची घोडा अडला ... लीना मेहेंदळे अकबर बिरबलाच्या गोष्टींमध्ये ही एक छानशी गोष्ट आहे . अकबराने आपल्या दरबा - यांना चार प्रश्नांच एक कोड टाकल . उत्तर एकाच ओळीत द्यायचे होते . त्याने विचारले - रोटी क्यूँ जली ? विद्या क्यूं गली ? पानी क्यूँ सडा ? घोडा क्यूँ अडा ? नेहमी प्रमाणे बिरबलाने खूप वेळ वाट पाहिली . इतर दरबाऱ्यां ना संधी दिली . आणि कोणालाच उत्तर येत नाही असे पाहून त्याने कोडयाचे उत्तर तीनच शब्दात सांगितले . - फेरा न था । फेरा - म्हणजे फिरवणे , उलटणे , गतीशील ठेवणे . तव्यावरची पोळी उलटली नाही तर जळते , विद्या शिकत-शिकवत राहिली नाही तर असलेली सुद्धा विस्मृतीत जाते. पाणी एकाच ठिकाणी साठवून राहिले तर सडते , त्यामध्ये किडे , डास , शेवाळ इ . साठतात . खळखळून वाहणारे पाणी शुध्द होत राहत . घोडा एकाच ठिकाणी बांधून ठेवला , त्याला फिरु दिलं नाही तर त्याचं पाय आखडतात . मग गरजेच्या वेळी तो ...