Posts

Showing posts from January, 2015
Image
६५ व्या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने साप्ताहिक विवेक तारीख: 24 Jan 2015 15:01:25 ****लीना मेहेंदळे **** दर वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ,  देशात दीर्घकाळ चालणाऱ्या ,  अबाधित चालणाऱ्या ज्या सुव्यवस्था असायला पाहिजेत व जपायला पाहिजेत ,  त्यांची आठवण करून देण्यासाठी आपण स्वातंत्र्यदिनापेक्षा वेगळा असा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या सुचारूपणाने टिकवायच्या शासनव्यवस्थेला साजेशी - किंबहुना आवश्यक अशी कौशल्ये आपल्यापाशी आहेत का ?  याची नोंद दर वर्षी घेतली पाहिजे. आपल्या शासनव्यवस्थेत अगदी छोटया-छोटया मुद्दयांवरदेखील सुधारणा व टिकाऊपणाच्या व सुचारूपणाच्या निकषावर उतरणाऱ्या सुधारणा आवश्यक आहेत. तु म्ही कधी कार चालवली आहे ?  ज्यांनी चालवली असेल ,  त्यांना माहीत आहे की ,  चौथ्या-पाचव्या गियरमध्ये गाडी असेल तर दर किलोमीटरसाठी खर्च होणारे पेट्रोल कमी लागते. पण गाडी पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या गियरमध्ये असेल तर पेट्रोल कंझम्शनचा दर जास्त असतो. म्हणजे इंजिन एफिशिएन्सी कमी असते. याच्या टेक्निकल कारणांमध्ये...

आटपाट देशांतील टोल संस्कृतच्या पाऊल खुणांची

Jan 1 2011 आटपाट देशांतील  टोल संस्कृतच्या पाऊल खुणांची       आटपाट देश होता- त्याचे नांव भारत. तिथे हर दोन- तीन वर्षांनी पूर यायचा किंवा दुष्काळ यायचा. लोक म्हणू लागले हा ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव दिसतोय. चला रे चला, ग्लोबल वॉर्मिंग थांबवू या. मग त्या देशांत खूप उत्सव होऊ लागले. “ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी उत्सव”. उत्सवांसाठी निवडलेल्या दिवसांना सुंदर- सुंदर नांवे देण्यांत आली- कधी वसुंधरा- दिवस, कधी-खाद्य- आपूर्ति- दिवस, तर कधी उर्जा संरक्षण दिवस.     लोक मोठ्या संख्येनेया उत्सवांना हजेरी लावत. रंगीबेरंगी कपडे घालून व रंगी बेरंगी फुगे हाती घेऊन लोक येत. ज्यांना घरूनच फुगे आणता आले नसतील अशांना सोईसाठी उत्सव- स्थळाच्याघरावरच फुगे विक्रीची सोय असायची. शिवाय त-हेत-हेचे खाद्य पदार्थ, गृहशोभेच्या वस्तू पण विक्रीसाठी असायचे.झोपाळे कांय, जायंट व्हील कांय, सर्व असायचे. उत्सव दिवसाबरोबरच कधी कधी ग्लोबल वार्मिंग थांबवण्यासाठी फ्रेंडली क्रिकेटमॅच पण खेळल्याजात- त्या पहायला देखील लोक गर्दी करत. घरी परत जातांना सर्व जण त्या आनंदोत्सवांची प्रशंसा करीत आणि आता ग्...