रत्नागिरीत नव्या आदर्शावर झोत
16 Dec 2010, 0136 hrs IST गजानन पळसुले देसाई कम्प्युटरवरील मराठी म्हटलं की, सध्या परवलीचा शब्द एकच आहे, ''युनिकोड''! मराठी संकेतस्थळे असोत की, ब्लॉग असो ''युनिकोड''ला पर्याय नाही हे आजच्या लहान मुलांनाही कळले आहे. ऑर्कुट किंवा फेसबुकवर मराठी मेसेज पाठवायचा असो किंवा ट्विटरवर लिहायचं असो, ''युनिकोड'' हवंच हे पुणे-मुंबईसारख्या शहरांतील लोकांना आता पाठ झालंय. पण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये अजून 'युनिकोड' पोहोचायचं आहे. कम्प्युटर गावागावांत गेलाय, पण 'युनिकोड' गेलेलं नाही. शहरातील मंडळी इंग्रजीच्या जेवढी जवळ आहेत, तेवढी गावातील आणि तालुक्यातील नाहीत. त्यामुळे इंग्रजी पत्र लिहिण्यापेक्षा त्यांना मराठी पत्र लिहिणं आजही सोपं वाटतं. शाळा असोत की, जिल्हा परिषदा, मराठी पत्रव्यवहार, अहवाल, करार-मदार, कोर्टातील मोठी कामं यांच्यासाठी दररोज हजारो मराठी पानं टाइप होतात. पूवीर्चे टाइपरायटर केव्हाच समाधिस्त झाले आहेत. कम्प्युटर सर्वांच्याच ओळखीचा झाल्यानं ही हजारो पानं कधी आकृती, कधी एपीएस, कधी श्रीलिपी तर कधी इझम, शिवाजी, शुषा वगैरे फ...