उद्धव गीता भाग १ भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात सात ते एकोणतीसवा अध्याय यात श्रीकृष्णाने उद्धवाला जो दीर्घ उपदेश दिला त्याचे वर्णन आहे . हाच उद्धव गीता या नांवाने ओळखला जातो . त्यापैकी ७ ते ९ अध्याय अवधूत आख्यान आहे , जे स्वतःच्या वेगळेपणामुळे एरवीही छोट्या आख्यानाच्या रूपाने प्रसिद्ध आहे . ऋषींकडून यदुवंशाला नष्ट होण्याचा शाप मिळाला . पण त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न बलराम अथवा श्रीकृष्ण यांनी केला नाही . त्या ऐवजी बलरामाने लगेच वनात जाऊन आपले अवतारकार्य संपवले . श्रीकृष्णही तसेच कांही करणार या विरह - जाणीवेने उद्धव व्याकुळ झाला . तू तरी आम्हास सोडून जाऊ नकोस असे म्हणू लागला . पण श्रीकृष्णाने त्याला बजावून सांगितले की आता तू च स्वजन बांधवांचा मोह सोड , द्वारका सोड , आणि संपूर्ण चित्त माझ्या ठायी ठेऊन समदृष्टिने पृथ्वीवर विचरण कर . समदृष्टी – म्हणजे प्रत्येक प्राण्यांत , किंबहुना चराचराच्या प्रत्येक कणांत मीच दिसेन अशी तुझी दृष्टि होऊ दे . मग उद्धवाला पुढील काळासाठी जणू शिदोरीच , असा उपदेश श्रीकृष्णाने केला . महाभारत युद्धानंतर एकदा अर्ज ु नाने पुन्हा मला ...
Comments