Also on the site nity_leela मी परत जाईन मूळ हिन्दी -- उदय प्रकाश अनुवाद -- लीना मेहेंदळे कार्तिकात जसे ढग परत जातात, ऊन जसे परतून जाते आषाढांत, दंव जसे गुपचुप परत जाते आभाळात अंधार परत जातो कोण्या अज्ञातवासात आपल दुखतं शरीर घोंगडीत लपेटून, थोडकस सुख आणि चिमूटभर सांत्वनासाठी सगळयांच्या नजरा चुकवून येणारी व्याभिचारिणी जशी परत जाते भयभीत आपल्या गुहेत, वृक्ष परतून जातात जसे बीजांत, आपली भांडी, पातेली, अवजारं, उपकरणं आणि घंगाळं घेऊन जशा परत जातात सर्व विकसित झालेल्या संस्कृत्या दरवेळी, पृथ्वीच्या पोटात, इतिहास जसा विलीन होऊन जातो कुण्या जमातीच्या लोकगाथांमधे विज्ञान जसे परतून जाऊन बसते देवऋषी आणि मांत्रिकाच्या जादू-टोण्या मधे, तमाम औषध माणसाच्या असंख्य रोगांना घाबरून जशी विलीन होतात कुण्या बाबाच्या स्पर्शात किंवा मंत्रात, मी परत जाईन, जशी समस्त महाकाव्य, संपूर्ण संगीत, सगळ्या भाषा आणि सा-या कविता परतून जातात एके दिवशी ब्रम्हांण्डात, मृत्यू जसा परत जातो आयुष्याचं गाठोडं डोक्यावर लादून, उदासवाणं, आणि रक्त जस परत जात कोणास ठाऊन कुठे, आपलया मागे शिरांमधे ठेऊन निर्जीव, निस्पंद जल, जसा एखादा नि...