02 सत्ता आणि सुव्यवस्था
सत्ता आणि सुव्यवस्था Article 2 in इथे विचारांना वाव आहे. -- लीना मेहेंदळे -- महाराष्ट्र टाइम्स सुव्यवस्था ही सर्व सजीव प्राणी मात्रांची पहिली आणि मूलभूत गरज आहे. झाडे अचल असूनही ही सुव्यवस्था कशी राखतात हा फार दार्शनिक किंवा भौतिक शास्त्राचा प्रश्न असेल. मात्र इतर चल प्राणी, पशु, पक्षी, किडे, मुंग्या, माणसं यांची सुव्यवस्था कशी रहाते हा समाजशास्त्राचा विषय आहे. अपरिहार्य पणे असे दिसून येते की, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी दृश्यमान, स्पष्ट दिसून येणार्या व जाणवणार्या सत्तेची गरज असते. सगुण निर्गुणच्या वादाचे हेच मूळ असावे. कारण निर्गुण निराकार ब्रह्माला देखील किमान ॐ, अल्ला किंवा गॉड या शब्दांची गरज भसतेच. सगुण ईश्र्वरी सत्तेची स्थळे तर आपल्याला जागोजागी दिसतातच. इंग्लिश मध्ये जरी म्हण असली कि दॅट गव्हर्नमेंट इज दी बेस्ट व्हिच गव्हर्नस दी लीस्ट, तरी ते गव्हर्निंग अगदी शून्या पर्यत येऊ शकलेलं नाही. एकच अपवाद आहे तो म्हणजे जेव्हा करुणा, प्रेम, अहिंसा या तत्वांवर सत्ता आधारीत असेल तेंव्हा. म्हणूनच रामाचे रामराज्य आपल्याला आजही आदर्श आणि हवेहवेसे वाटते. म्हणूनच भगवान बुद्ध, महावीर किंव...