Posts

Showing posts from February, 2021

कामाचे तंत्र बदसा आनंद सापडेल सांगली येथे भाषण

Image
 

शिक्षण व्यवस्था कशी असावी - (इंगलिश लेखावरून -- अपूर्ण)

  शिक्षण व्यवस्था कशी असावी नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच देशातील समाज व्यवस्था बिघडली आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज उरलेली नाही . या बिघाडांचे पाढेही खूपदा वाचले गेले आहेत . भरमसाठ फुगलेली आणि फुगत चाललेली जनसंख्या , वाढत चाललेली भीषण आर्थिक विषमता , भ्रष्टाचार , जात - प्रांत - धर्म भाषा यातून वाढत चाललेली दुफळी आणि समाजमनाचे विभाजन , बहुराष्ट्रीय कंपन्यांचे देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवहारांभोवती आवळत चाललेले पाश , शिक्षणाक्षेत्रात व्यापून उरलेले अभाव आणि त्यातून निर्माण होणारी निरक्षरता , प्रचंड बोकाललेला चंगळवाद , कुप्रशासन , ब्रेनड्रेन इत्यादी काही ठळक उदाहरण सांगता येतील . या सर्वात काही बदल घडवायचा असेल तर तो आपणच करायचा आहे आणि तो शिक्ष णाच्या माध्यमानेच होऊ शकतो . पण त्यासाठी आताचे शिक्षण आणि शिक्षणतंत्र दोन्ही कुचकामी ठरलेले आहेत . त्यामधे बदल होणे नितांत गरजेचे आहे . शिक्षण म्हणजे काय आणि कशासाठी ? शिक्षण ही एक अखंड चालणारी प्रक...