Posts

Showing posts from January, 2019

आपली शिक्षण व्यवस्था -- अपूर्ण

आपली शिक्षण व्यवस्था स्वतंत्र भारताची वाटचाल पंच्याहात्तर व र्षाची होत असतांना देशातील समाज व्यवस्था बिघडली आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज उरलेली नाही . या बिघाडांचे पाढेही खूपदा वाचले गेले आहेत . बिघडत चाललेले राजकारण , भ्रष्टाचार , वाढत चाललेली भीषण आर्थिक विषमता , जात - प्रांत – धर्म - भाषा यातून वाढत चाललेली दुफळी आणि समाजमनाचे विभाजन , बहुराष्ट्रीय कंपन्यांचे देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवहारांभोवती आवळत चाललेले पाश , शिक्षणाक्षेत्रात व्यापून उरलेले अभाव आणि त्यातून निर्माण होणारी निरक्षरता , प्रचंड बोकाललेला चंगळवाद , कुप्रशासन , ब्रेनड्रेन इत्यादी काही ठळक उदाहरण सांगता येतील . मला वाटत नसले तरी कित्येकांना वाढलेली जनसंख्या हे ही कारण वाटते . ब्रेनड्रेन नव्हे , ब्रेनबँक असे कधीकधी म्हटले जाते . परंतू सर्व मोठ्या शहरात वृद्धाश्रम वाढत आहेत , मुले परदेशांत व इकडे परत येऊ इच्छित नाहीत म्हणून घरात फक्त वृद्ध आईबापच हे चित्र पसरत चालले आहे . कित्येक परदेशी मुलांना विचारल्यावर ते सांगतात की परदेशांतील मोठ्या पगाराकडे आम्ही दुर्लक्ष करू , पण या देशांत जी अस्वच्छता आ...