Posts

Showing posts from April, 2018

व्याकरणम् १५ Pathami Sanskritam 96

Image

पठामि व्याकरणम् ६ Pathami Vyakaran 6

Image

नवी विटी आली आता नव्या दिशेने सुधारणा हव्यात.

नवी विटी आली आता नव्या दिशेने सुधारणा हव्यात. नुकतेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच फेरफार झाले. उठावदार काम नसण्याच्या मुद्यांवर कित्येक मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला.नेमणुकींच्या जुन्या पद्धतीला फाटा देत पूर्वी उत्तम प्रशासक म्हणून गाजलेल्या चार निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना एकत्रपणे व प्रशासनास उजाळा देण्याच्या हेतूने मंत्रीमंडळात घेण्यात आले. अशा प्रकारे केंद्रात नवी विटी आली. ज्या मंत्र्याना राजीनामा द्यावा लागला नाही, व खास करुन ज्यांना बढती मिळाली, अशांसमोर एक मोठे आव्हान किंवा इशारा उभा ठाकला आहे. पण इतके करुन यश मिळणार का ? हा प्रश्न उरतोच. त्याही पेक्षा दिशा योग्य आहे का आणि वर्तणूक योग्य आहे का हे प्रश्नच अधिक मोठे होऊन जातात. आधी वर्तणुकीचा प्रश्न घेऊ या. मागील वर्षी नोटाबंदी आली तिचे संमिश्र स्वागत झाले. दहशतवाद्यांना नकली नोटांच्या आधारे जी सहजकृत्य करता येत होती ती निश्चितच बंद झाली. ज्या सरकार विरोधंकांकडे किंवा हवाला डीलर्सकडे किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा होता, तो अडकला. पुढे कमिशन देऊन व काही बँक अधिकाऱ्यांच्या भ्रषटतेतून त्यांचा पैसा हळूहळू प...