Posts
Showing posts from February, 2018
सामाजिक सुरक्षा आदिवासींची सा विवेक १५ जाने. २०१८
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक सुरक्षा आदिवासींची विवेक मराठी 15-Jan-2018 ***लीना मेहेंदळे*** आदिवासींना गरीब, बिचारे, अभागी, दुर्दैवी ठरवून त्यांना उपकृत करण्याच्या योजना आखण्याऐवजी त्यांच्या वनवासी असण्याला एक कौशल्य मानून त्यांच्या या व इतर सर्व कौशल्यांचे सबलीकरण करण्याच्या योजना केल्या, तरच खऱ्या अर्थाने आदिवासी विकास होईल. मग त्यांना आपल्या दातृत्वदर्शक सामाजिक सुरक्षेची गरज भासणार नाही. भारतीय आदिवासी हा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिवंचित असा वर्ग म्हणता येईल. यांच्या वंचित राहण्याचे एक कारण आहे त्यांचे भौगोलिक स्वरूप, तर दुसरे कारण आहे कागदी प्रमाणपत्रांवर आधारलेली आपली शैक्षणिक संस्कृती. स्त्रियांच्या व बालकांच्या सामाजिक सुरक्षेचे प्रश्न संपूर्ण देशभर प्रत्येक जाती-जमातींमध्ये आहेत. कृषीचे प्रश्नही देशभर आहेत. आदिवासींचे तसे नाही. त्यांच्या राहण्याच्या जागा भौगोलिकदृष्टया एकवटलेल्या असून इतर भागांपासून त्यांना वेगळे काढता येते - किंवा वेगळे ठेवता येते. यातून त्यांच्या भागाकडे दुर्लक्ष किंवा जादा पोटतिडिकीने विशेष लक्ष देता येऊ शकते. त्यांच...