राष्ट्रीय समृध्दीची ओळख, सामाजिक सुरक्षेचे चिंतन विवेक मराठी 18-Dec-2017
रा ष्ट्रीय समृध्दीची ओळख, सामाजिक सुरक्षेचे चिंतन विवेक मराठी 18-Dec-2017 आजच्या दिवसाला सामाजिक सुरक्षेची गरज कोणकोणत्या घटकांना आहे, त्यांची एक भली मोठी यादीच होईल. त्यामध्ये कायद्याने ठरवलेल्या गुन्ह्यांबाबत सुरक्षा, तसेच कायद्याने गुन्हा ठरवलेला नाही अशाही सामाजिक सुरक्षा मोजाव्या लागतील. त्याच्या उपाययोजनेमध्ये शासनाने काय केले किंवा करता येईल किंवा समाजाने काय केले व करता येईल, याचाही आढावा घ्यावा लागेल. आजचा काळ, आजची भारतीय व जागतिक परिस्थिती, भारतीय राज्यघटना आणि शासन प्रणाली, त्यामध्ये असलेल्या सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि त्याला समाजाचे लाभलेले किंवा न लाभलेले अधिष्ठान यांचा विचार करू या. व्यष्टी आणि समष्टी! मानवालाच नव्हे, तर सर्वच प्राण्यांना याचे भान असते. समष्टीलाच कधी निसर्ग म्हणतात, पर्यावरण म्हणतात तर कधी समाज म्हणतात. ज्या त्या चिंतनाच्या व्याप्तीनुसार समष्टीचा अर्थ ठरत असतो. व्यक्तिगत सुरक्षा हवी हे सर्वच सजीव प्राण्यांना जन्मत:च कळत असते. त्या दृष्टीने प्रत्येकाची वाटचाल सुरू असते. समष्टीचे भान थोडे उशिरा येते. कमी-जास्त प्रमाणात येते. हळूहळ...