खादी... एक विचार अनेक आचार साप्ताहिक विवेक 16-Mar-2017
खादी... एक विचार अनेक आचार साप्ताहिक विवेक मराठी 16-Mar-2017 , भारतीय व युरोपीय वस्त्रोद्योग, भारताची कृषी व वस्त्र संस्कृती, उद्योगक्रांती येण्याआधीच्या युरोपातील लोकर-आधारित वस्त्रसंस्कृती , अमेरिकेत गुलामांच्या घामातून साकारलेला कापूस-आधारित वस्त्रोद्योग, भारताची विकेंद्रित अर्थव्यवस्था व त्यातून ग्राम-स्वावलंबनावर आधारलेली संस्कृती या सर्वांविषयी टप्प्याटप्प्याने विचारमंथन सुरू झाले. या नवीन दृष्टीमुळे आचरणांत खादी आणली गेली. बिहारच्या प्रचंड उन्हाळयात सुती साडया, हँडलूम साडया आणि खादीचे सलवार कुर्ते पसंत पडू लागले आणि इतर कपडे तेवढे भावेनात. मी खादी-भक्त आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण हे की खादीचा स्पर्श आपल्या अंगाला सुखकारक असतो आणि सिंथेटिक कापडासारखा अपायकारक तर मुळीच नसतो. तसे पाहिले, तर मिलमधील सुती कापडदेखील अंगाला अपायकारक नसते. पण त्याचा खादीच्या स्पर्शाइतका सुखद स्पर्श नसतो - खादीसारखा समशीतोष्ण म्हणजे थंडीत ऊब देणारा व उष्म्यात थंडावा देणारा असा नसतो. म्हणूनच जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी खादीबद्दल बोलायल...