Posts

Showing posts from February, 2015

अच्युतराव आपटे --स्मरणिकेसाठी (२०००)

26.2.2000 अच्युतराव अच्युतराव आपटे गेल्याची बातमी आली ती मनाला चटका लावतच . पुण्याहून मिस्टरांनी फोन करुन सांगितल - वाईट बातमी आहे - तेंव्हा मनात पहिली शंका हीच आली . त्यांची प्रकृति अगदी हळू हळू खालावत होती . तरीही मन व चिंतनपर बुद्धि शेवटपर्यंत खंबीर होते - म्हणूनच ऐवढ्या लवकर ते जातील अस वाटल नव्हत . अच्युतरावांचा आणि माझा परिचय गेल्या पंचवीस वर्षांचा होता . वयाने व मानानेही ते खूप मोठे होते . तरी पण त्यांना काका वगैरेम्हटलेल आवडत नसाव . कधीही अचानक येई - “ मी अच्युतराव आपटे बोलतोय् .” त्यामुळे मनात तोच संदर्भ ठसला . खरे तर अच्युतराव हे माझ्या वडिलांचे सहपाठी . मला हे आधी माहीत नव्हते . ते त्यांनीच सांगितले . पुढे माझे वडील पुण्याला आल्यावर त्यांच्या गाठीभेटी घडत . पण मला नेहमीच त्यांनी एक स्वतंत्र व्यक्ति म्हणू वागवले . माझा व त्यांचा परिचय मी पुण्याला सर्वप्रथम पोस्टिंगवर प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर म्हणून आले तेंव्हाचा . शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात - मुलांना अगदी सुरुवातीपासून कौशल्य शिक्षण - स्किल एज्युकेशन द्यावे . वगैरे पुष्कळ विचार तेंव्हापासून मनात येत होते ....