मंदिरांचे ऐतिहासिक योगदान सा. विवेक मधील माझा लेख दिनांक 22 Dec 2014 भारतीय संस्कृतीत देवाचे स्थान काय? हा प्रश्न विचारला तर मोठे चमत्कारिक उत्तर मिळते. देव असतो का? याला सांख्य तत्त्वज्ञानात 'नाही' असे उत्तर दिले गेले. मात्र देव नसून त्याऐवजी अपरिवर्तनशील असा पुरुष आणि परिवर्तनशील अशी प्रकृती असतात आणि त्यांचेच एकत्रित व्यवहार आपल्याला जगभर चालताना दिसतात असा सिध्दान्त मांडणारे सांख्य तत्त्वज्ञान मोठया प्रमाणात लिहिले गेले. सर्व प्रकारच्या दुःखांचे आणि तापाचे निराकरण हवे असेल तर नियमित अभ्यासाने पुरुष-प्रकृति भेदाचा अनुभव घ्यावा त्यातून कैवल्य मिळते. या पुरुषामधील 'चैतन्य' किंवा ब्रह्म हे अभ्यास करण्यायोग्य एक वेगळे तत्त्व असून ते म्हणजेच ईश्वर, असा सिध्दान्त योगसूत्रांमध्ये मांडला गेला. थोडक्यात, कैवल्याची प्राप्ती होण्यासाठी ईश्वराची किंवा ईश्वरकृपेची गरज नसून पुरुष-प्रकृती भेद ओळखून त्याप्रमाणे वागता आले तरी पुरते, असा सांख्यांचा निरीश्वरवादाचा सिध्दान्त, तर ईश्वराची श्रध्दापूर्वक उपासना केल्याने कैवल्याचा मार्ग सुकर होतो हा योगसूत्रकारांचा ईश्वरवादी सिद्धांत....
Posts
Showing posts from December, 2014