महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे कार्य
दि 24 फेब्रुवरी 2009 रोजी जय महाराष्ट्र कार्यक्रमामधील मुलाखतीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव आणि महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव लीना मेहेंदळे यांनी बालहक्क संरक्षण आयोगाचे कार्य कशा पद्घतीने राबविण्यात येणार आहे. याची माहिती महान्यूजला दिली ती अशी... बालहक्क संरक्षण म्हणजे नेमकं काय आणि बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नावर बोलताना श्रीमती मेहेंदळे म्हणाल्या की, भारत देश हा 'यंग इंडिया' म्हणून ओळखला जातो. देशात 0 ते 20 या वयोगटातील 40 टक्के लोकसंख्या आहे. बालकांच्या एकूण लोकसंख्येचे हक्क अबाधित रहावे, त्यांच बालपण जपलं जावं, त्यांच्या प्रश्नांची तड लावावी यासाठी शासनाचा बालहक्क विभाग आहे. पण शासकीय चाकोरीतून प्रत्येक प्रश्नाची तड लागू शकत नाही. म्हणून केंद्राने बालहक्क संरक्षणासाठी कायदा केला. केंद्र स्तरावर बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यांनी देखील असा आयोग स्थापन केला. आयोगाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य आहे. 2007 मध्ये याविषयीची घ...
Comments