Posts

Showing posts from November, 2011

अज्ञान आणि विज्ञान- एक मजेशीर घटना

अज्ञान आणि विज्ञान- एक मजेशीर घटना १९९४-९५ मधे मी नाशिक येथे महसूल आयुक्त असतांना घडलेली ही सत्यघटना आहे. १९९५ मधे नाशिक विभाग दुष्काळग्रस्त होता. सर्वच तालुक्यामध्ये पर्जन्यमान कमी झाले. पिके जळाली. मोठे नुकसान झाले.रबीचे पीक बरे आल्यामुळे वर्ष अखेरीला लोकांना दिलासा मिळाला पण दुष्काळाची भयछाया लोकांच्या मनावर राहून गेली. त्यांत एकूण पाऊस कमी झाल्याने विहीरींचे पाणी आटले होते. त्यामुळे पुढच्या वर्षी नव्या विहीरी खणण्याची गरज निर्माण झाली. आपल्याकडे GSDA म्हणजे ground water survey authority या नावाचे एक सरकारी खाते असते. त्यांच्या मार्फत दरवर्षी ब-याच विहीरी खोदल्या जातात.त्यातील सुमारे ८० टक्के सरकारी खर्चाने असतात, त्यामुळे त्यांनी पाण्याची शक्यता पडताळली, विहीरी खणल्या आणि त्यांना पाणी लागले नाही तर त्याचे फारसे वैषम्य कुणाला वाटत नाही, कित्येकदा त्याची माहिती कुणाला मिळत नाही. खुद्द त्या खात्याकडे अभ्यासकाच्या दृष्टीने ही सर्व माहीती मांडून त्यांचे यशस्वी - अयशस्वी हे गणित मांड़ले जाते कां? हा वेगळा प्रश्न आहे. पण जरी तस होत असल तरी त्याची माहीती लोकांपर्यंत नसते. म...