अजून खूप काही करायचं आहे...
अजून खूप काही करायचं आहे... (मुलाखत -- दै. सकाळ, दि. 14.3.2009 शब्दांकन ः वैशाली चिटणीस vaishali chitnis धन्यवाद, वैशाली) ........................... लीना मेहेंदळे ........................... देशातलं प्रशासन बिघडत चाललंय असं त्यावेळी आम्हाला वाटे. प्रशासनात इतका भ्रष्टाचार आहे तर तिथं जाऊन तुम्ही काय करणार, असा प्रश्न विचारला जाई. आमचं उत्तर असे, की निदान एवढं तरी समाधान असेल की एक तरी अधिकारी भ्रष्ट नसेल. आजही आयएएस अधिका्-याची प्रतिमा देशाला धोरणं देणारा, देशाच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडणारा, देशाच्या प्रगतीत ज्याचा वाटा आहे अशीच आहे. ---------------------------- माझे वडील बिहारमध्ये दरभंगा इथं संस्कृत आणि फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. त्यामुळे मी वाढले तिथं. महाराष्ट्रातले आयएएस अधिकारी तिथं आले, की त्यांचं हमखास वडिलांकडे येणं-जाणं असे. त्यामुळे आपणही प्रशासकीय सेवेत जावं, त्यासाठीची परीक्षा द्यावी, असं मला वाटायला लागलं. खरं तर माझा अगदी बेसिक इंटरेस्ट होता तो फिजिक्समध्ये. त्यातच एम.एस्सी. करून मी पीएच.डी.साठी रजिस्ट्रेशनही केलं होतं. शिवाय कॉलेजमधे शिकवतही होते. तो माझ...