Posts

Showing posts from December, 2007

ना परतीची वाट

ना परतीची वाट Also kept on http://www.geocities.com/nity_leela/Na_partichi_Vaat2_TBIL_Mangal.doc पंचतंत्रात एक खूप छान कथा सांगितली आहे. एक म्हातारा सिंह शिकार जमेना म्हणून तळयाच्या काठाशी राहू लागला. पणी प्यायला छोटे जनावर आले की तो त्याला मारुन खाऊ शकत असे. एकदा एक कोल्हा त्या जागी आला. दुरुनच निरसून पाहिले तो त्याला कळले की इथे प्राण्यांची जी पावले उमटली आहेत ती फक्त तळयाकडे जाणारी आहेत, तिकडून परत येणारी पावल दिसतच नाहीत. ही ना परतीची वाट आपल्याला नको, अस म्हणून कोल्हा तिथून दुसरीकडे निघून गेला, असे त्याचे प्राण वाचले. तुम्हाला ना परतीच्या वाटेची पुष्कळ उदाहरण माहीत असतील. मोजू या तर. खूपसे रस्ते वन-वे असतात. कित्येक इमारतींना इन-गेट वेगळे आणि आऊट-गेट वेगळे असते. ही झाली दोन उदाहरणे. सर्व व्हॉल्वस्‌ हे याच उपयोगासाठी असतात - की द्रव पदार्थांचा प्रवाह फक्त एकाच दिशेने होऊ द्यायचा, त्यांना उलट दिशेने जाऊ द्यायचे नाही. आपल्या हदयातील रक्त वरच्या कप्प्यांतून खालच्या कप्प्यांत जाते तिथे असाच व्हॉल्व असतो. शिवाय तुम्ही ऑस्मोसिसच्या (osmosis) धडयापर्यंत पोचला असाल, तर तेही अस...

मना अजाणा...... (मराठी कथा)

मना अजाणा.. लीना मेहेंदळे आज तू या रोपाच्या समोर कुंडीच्या काठावर डोक टेकून बसला आहेत. आठवतय्‌ ते आधी कुठे होत ? खूप दूर कुठेतरी. खर तर ते रोप पण नव्हत- निव्वळ एक बीज. छे, ते ही नाही ! काहीच नाही ! फक्त एक अनुभूति ! एक अनामिक अस्तित्व बोध - आहे, कुठे तरी | मग हळूच ते तुझ्यापर्यंत कस आल ? अमूर्त होत ते मूर्त होवून | अनामिक होत ते नामधारी बनून ? का तू त्याला साद घातलीस ? कां त्याला गोंजारलेस ? कां त्याला कवेत घेऊन त्याच्या सांवळया, कोमल पानांवर आपले ओठ टेकलेस ? कुठून तरी तू कुंडी आणलीस, कुठून तरी माती आणि कुठून तरी पाणी | आणि रोपाला अलगद रुजायला एक जागा मिळवून दिलीस. राहील इथेच, आपल्या बाल्कनीत - तू मनोरमाला म्हटलेस. आणि त्याला रोज रोज पाणी कोण घालणार ? मला नाही जमायच ते. मनोरमा म्हणाली, काळजी नको करुस. मी टाकत जाईन. मधे खूप दिवस गेले. विदेशातून आल्यापासून तू आपल्या नोकरीत बुडून गेला होतास. रोज उशीरा उठायच. धावत पळत ऑफिस गाठायच. परत येतांना कधी मुलांना आणायच तर कधी भाजी बाजार करायचा. कधी स्कूटर सर्व्हिसिंग, कधी शेअर्सच्या मागे धावाधाव. खूपदा मित्रांबरोबर बियर पिणं. रोज उ...

मना अजाणा.. (मराठी कथा)

आज तू या रोपाच्या समोर कुंडीच्या काठांवरडोकं टेकून बसला आहेस. आठवतयते आधी कुठे ङोतं? खूप दूरकुठेतरी. खरं तर ते रोप पण नव्हतं-- निव्वळ एक बीज ! छे, तेही नाही ! काहीच नाही ! फक्त एक अनुभूती ! एक अनामिक अस्तित्व बोध-- आहे, कुठे तरी ! मग हळूच ते तुझ्यापर्यंत कसं आल? अमूर्त होतं ते मूर्त होऊन? अनामिक होतं ते नामधारी बनून? कां तू त्याला साद घातलीस? कां त्याला गोंजारलेस? कां त्याला कवेत घेऊन त्याच्या सांवळ्या कोमल पानांवर आपले ओठ टेकलेस..... पुढे वाचा ---------------------------------------------------------------- अंतर्नाद मार्च 2007