शिक्षणबदलात समाजाची मते आधीच घ्या
मटाच्या 28 JUN 2019 मधे लेख शिक्षणबदलात समाजाची मते आधीच घ्या --- लीना मेहेंदळे २४ जून २०१९ बालभारती दुसरीचे नवे गणित या विषयावर इतकी प्रतिक्रिया उमटली की विधानसभेत त्यावर तज्ज्ञ समितीकडून चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले . मुळात शिक्षण पुस्तकात बदल केला की पेनच्या एका फटकाऱ्यामुळे लक्षावधि मुलांवर , तसेच शिक्षक , व पालकांवर त्याचा परिणाम होणार असतो . म्हणून तो करताना मोठ्या प्रमाणावर समाजमंथनाची गरज असते . तसे न करताच बालभारतीने हा बदल केल्यामुळे आता हा बदल कसा बदलच नाहीये हे सांगावे लागत आहे . आधी समाजमंथन केल्याने हा प्रसंग टळला असता . बदल का केला याची मुख्यत्वे तीन कारणे सांगितली -- ती का असमर्थनीय वाटतात ते पाहूया . पहिला विचार होता जोडाक्षरांचा -- म्हणे मुलांना जोडाक्षरविरहित शिकवण्यासाठी हा बदल आहे . तर मग इतर विषयांनाही तसे केले का ? की गणिताचा एकांगीच विचार केला ? एकीकडे अमेरिकेसारखे देश संशोधन करून आदेश काढतात की मुलांना संस्कृत शिकवा -- त्याने उच्च ा रण , स्मरणशक्ति , इ . इ . बरेच काही वाढते . आणि आपण जोडाक्षर...