सामाजिक सुरक्षा लेख २ महिलांची सामाजिक सुरक्षा
सामाजिक सुरक्षा लेख २ http://epaper.evivek.com/epaper.aspx?lang=2025&spage=Mpage&NB=2017-12-31#Mpage_14 सामाजिक सुरक्षा व महिला विवेक मराठी 26-Dec-2017 ***लीना मेहेंदळे*** आज भारतीय महिलांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे, ती धोक्यात आणणारे प्रमुख मुद्दे गुन्हेगारीत मोडतात. बलात्कार आणि स्त्रीभू्रण हत्या हे ते दोन विषय. हुंडाबळी, महिला कैदी, अनाथ बालिका, मतिमंद बालिका, देहव्यापारात फेकल्या गेलेल्या महिला, या आणि अशा अनेक महिलांना सामाजिक सुरक्षेची गरज आहे. महिलांच्या बाबतीत सामाजिक सुरक्षा, महिला सबलीकरण आणि गुन्ह्याचा बळी न होणे या तिन्ही बाबी एकमेकांशी एवढया निगडित आहेत की त्यांच्या सीमारेषा पुसलेल्याच आहेत. कोणती बाब सामाजिक सुरक्षेची आणि कोणती सबलीकरणाची हे ठरवणे कठीण आहे. एकूणच स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षेचे प्रश्न खूप आहेत व खूप गंभीर आहेत. त्यासाठी समाजप्रबोधन, संस्कार, विशेषतः एकत्र कुटुंबाचा व स्त्री सन्मानाचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. मागील लेखात सामाजिक सुरक्षेचा विचार करताना आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची थोडी दखल घेतली होती....