विज्ञान आणि अज्ञान --नवप्रभा मधील माझा लेख
http://www.navprabha.com/?p=7469 http://www.navprabha.com/?p=7484 - लीना मेहेंदळे (पूर्वार्ध ) आपला देश सध्या तरी विज्ञान विषयात इतर प्रगत देशांच्या मानाने खूप मागे आहे आणि याचसाठी लोकांमध्ये विज्ञानाचे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाणवण्याची संधी आपण सोडता कामा नये. पण त्याआधी वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय त्याचा थोडा उहापोह या घटनेच्या माध्यमातून करूया. कॉलेज जीवनात खूप जणांचे स्वप्न असते रीसर्चचे…. पण रीसर्च अथवा संशोधन कसे करायचे ही शिकवण फारशी दिली जात नाही. आपल्या देशात खूप चांगल्या पद्धतीची संशोधनेही होत नाहीत. विज्ञान विषयात इतर प्रगत देशांच्या मानाने आपण खूपच मागे आहोत. आपल्याला मोठे संशोधन करायला मिळेल किंवा न मिळेल, पण वैज्ञानिक दृष्टीकोन असेल तर छोट्या प्रसंगातूनही काहीतरी साध्य करता येते. हा दृष्टीकोन लहान मुलांत आणि सामान्य माणसांत देखील आला पाहिजे. याचसाठी लोकांमध्ये विज्ञानाचे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाणवण्याची संधी आपण सोडता कामा नये. पण त्याआधी वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय याचा थोडा उहापोह. घटना विचार करण्याजोगी आहे… मजेशीर म्हणूया हवीतर. त्...